एक्स्प्लोर

Deool Band 2 Trailer Snehal Tarde, Mohan Joshi: 'देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी...'; शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा, 'देऊळ बंद 2'चा दमदार ट्रेलर पाहिलात?

Deool Band 2 Trailer Snehal Tarde, Mohan Joshi: आनंदाबरोबरच उत्सुकता वाढली असतानाच नुकताच 'देऊळ बंद 2' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि स्वामी भक्तांच्या आनंदात आणखीनच भर पडली. 

Deool Band 2 Trailer Snehal Tarde, Mohan Joshi: सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकत बॉक्स ऑफिसवर (Deool Band 2 Box Office Collection) मोठं यश मिळवलेलं. अशातच आता या सिनेमाचा पुढचा भाग 'देऊळ बंद 2' (Deool Band 2 Trailer) येत आहे. 21 मे 2026 सिनेमा महाराष्ट्रभरात रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आनंदाबरोबरच उत्सुकता वाढली असतानाच नुकताच 'देऊळ बंद 2' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि स्वामी भक्तांच्या आनंदात आणखीनच भर पडली. 

सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' (Deool Band) या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकत बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं होतं. आता या गाजलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'देऊळ बंद 2' येत्या 21 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

दिग्दर्शक प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांच्या या चित्रपटात यावेळी एका शेतकरी महिलेची संघर्षमय कथा पाहायला मिळणार आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट देवाला जाब विचारणारी ही महिला कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. अभिनेत्री स्नेहल तरडे ही भूमिका साकारत असून, मोहन जोशी श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकणार आहेत. 

'देऊळ बंद' (Deool Band) मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Actor Mohan Joshi) यांनी आपल्या सशक्त अभिनयानं आणि आवाजानं स्वामी समर्थ (Swami Samartha) अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभं राहून आपल्याशी संवाद साधत आहेत, असं प्रेक्षकांना वाटत होतं. तेच सर्वांना 'देऊळ बंद 2'मध्ये अनुभवायला मिळणार आहे. 80 वर्षांच्या मोहन जोशींचा अभिनय पाहून सर्वांना खरोखरंच स्वामीच समोर उभे असल्याचा भास होत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

'देऊळ बंद 2' ट्रेलरमध्ये नेमकं काय दाखवलंय? 

मराठी सिनेसृष्टीतील बहुचर्चित 'देऊळ बंद 2' सिनेमाचा दमदार ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू होती. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटात यावेळी श्रद्धा, शेतकरी आणि वास्तववादी प्रश्नांची वेगळी मांडणी पाहायला मिळणार आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता त्याचा दुसरा भाग नव्या कथानकासह प्रेक्षकांसमोर येत आहे. ट्रेलरमध्ये एका शेतकरी महिलेचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि ग्रामीण भागातील गंभीर वास्तव यावर थेट भाष्य करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या वेळी देवाकडे प्रश्न विचारणारी आणि व्यवस्थेला जाब विचारणारी एक महिला कथानकाच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येत आहे.

"मी तुमचं अस्तित्व मान्य करेन पण, तुम्ही आधी परीक्षा द्या...", असं आवाहन ही हतबल झालेली महिला थेट देवाला करते, आणि इथून सुरू होतो देवाच्या परीक्षेचा प्रवास. शेतात, दऱ्याखोऱ्यांमध्ये, एसटीने, माणसांनी खचाखच भरलेल्या गाडीतून या महिलेचा अन् देवाचा प्रवास सुरू होतो. आता या प्रवासात शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या अधोरेखित होणार, यावर स्वामी या शेतकरी महिलेला काय मार्ग दाखवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'देऊळ बंद 2' हा चित्रपट येत्या 21 मे रोजी प्रदर्शित होणार असून, ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget