एक्स्प्लोर

Abhishek Bachchan Riteish Deshmukh Raja Shivaji: 'राजा शिवाजी'साठी एकही रुपयाचं मानधन का घेतलं नाही? अखेर अभिषेक बच्चन यानं मौन सोडलं, म्हणाला...

Abhishek Bachchan Riteish Deshmukh Raja Shivaji: सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन यानं या वृत्तांबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं असून, माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांना त्यानं पूर्णविराम दिला आहे.

Abhishek Bachchan Riteish Deshmukh Raja Shivaji: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या मराठी सिनेमामुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवसांहून अधिक काळ लोटला आहे आणि प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन रितेश देशमुखनं (Directed by Ritesh Deshmukh) केलं असून, त्यानंच या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj ) यांची मुख्य भूमिकाही साकारली आहे. सलमान खान (Salman Khan), विद्या बालन (Vidya Balan) आणि अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या सिनेमात कोणतंही मानधन न घेता काम केलं आहे. याच पार्श्वभूमीवर, सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन यानं या वृत्तांबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं असून, माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांना त्यानं पूर्णविराम दिला आहे.

गेल्या काही काळापासून ज्या प्रश्नाची बरीच चर्चा सुरू होती, त्याबाबत अभिषेक बच्चननं अखेर आपले मौन सोडलं आहे. कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या अभिषेकसारख्या अभिनेत्यानं 'राजा शिवाजी' या सिनेमात कोणतंही मानधन न घेता काम करण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नावर अभिनेत्यानं दिलेलं उत्तर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. अभिषेक बच्चन यानं स्पष्ट केलं की, रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांच्या या 'ड्रीम प्रोजेक्ट'मध्ये त्याला केवळ एक सिनेमा दिसला नाही, तर त्यामागील भावना आणि आदर यांचा तो एक आविष्कार वाटला. नेमक्या याच कारणामुळे त्यानं या प्रोजेक्टसाठी आपला बिनशर्त होकार दिला.

अभिषेक बच्चन नेमकं काय म्हणाला? (Abhishek Bachchan On Raja Shivaji Movie)

News18 ला अभिषेक बच्चन यानं नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, जेव्हा एखाद्या कलाकाराला एखाद्या कथेवर किंवा दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनावर विश्वास असतो, तेव्हा मानधन ही गोष्ट दुय्यम ठरते... आजच्या काळात लोक सोशल मीडिया रिल्स आणि बातम्यांमधून कलाकार किती मानधन घेतात किंवा किती व्हॅनिटी व्हॅन मागतात, यावर चर्चा करतात... पण शेवटी सिनेमा हा एक कलाप्रकार आहे... जर आमचा एखाद्या गोष्टीवर विश्वास असेल, तर आम्हाला मानधन न घेण्यात कोणतीही अडचण नसते. हा केवळ पैशांचा व्यवहार नसून एक भावनिक गुंतवणूक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीनं खऱ्या अर्थानं प्रेरित होता, तेव्हाच खऱ्या कलेचा जन्म होतो..."

अभिषेक बच्चन यानं असंही नमूद केलंय की, काम करत असताना कलाकारांना प्रेरणा मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचं कौतुक करताना तो म्हणाला, "आजकाल चित्रपट निर्मितीमध्ये अनेक गोष्टींचा हिशोब केला जातो; मात्र, सर्व काही केवळ आकडेवारीवरच अवलंबून नसतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र होता. त्यांनी याकडे कधीच केवळ एक 'प्रोजेक्ट' म्हणून पाहिलं नाही, तर त्याऐवजी ही काहीतरी अधिकच महान आणि पवित्र गोष्ट आहे, या दृढ विश्वासानं त्यांनी त्यावर काम केलंय..."

मराठी चित्रपटसृष्टीत यापूर्वी इतक्या भव्य प्रमाणावर कोणताही सिनेमा झाला नाही : अभिषेक बच्चन 

सिनेमाची भव्यता आणि त्यातील आव्हानांवर चर्चा करताना अभिषेक बच्चन यांनी नमूद केलंय की, मराठी चित्रपटसृष्टीत यापूर्वी इतक्या भव्य प्रमाणावर कोणताही सिनेमा निर्माण झाला नव्हता. तो म्हणाला की, "चित्रपटाच्या संपूर्ण टीमला (युनिटला) आनंदी, सुरक्षित आणि उत्साही ठेवणं हे एक अत्यंत कठीण काम होतं, परंतु रितेश आणि जिनिलिया यांनी ते अत्यंत सुरेखपणे हाताळलंय. मला कोणाकडूनही एकही तक्रार ऐकायला मिळाली नाही."

'राजा शिवाजी' सिनेमाद्वारे अभिषेक बच्चन मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तो म्हणाला, "मुंबईतच लहानाचा मोठा झाल्यामुळे मला मराठी भाषेची नक्कीच ओळख होती. पण पडद्यावर पहिल्यांदाच मराठी बोलताना मला थोडी धाकधूक वाटत होती." तरीही, रितेशच्या उपस्थितीमुळे त्याला मोठा दिलासा मिळाला आणि रितेश सर्व गोष्टींची काळजी घेईल, याबद्दल त्याला पूर्ण खात्री होती, असंही तो म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raja Shivaji Box Office Collection Day 10: 'राजा शिवाजी' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई; 100 कोटींच्या क्लबपासून फक्त काही पावलं दूर

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget