एक्स्प्लोर

Deool Band 2 BO Collection: 10 कोटींच्या बजेटवर तब्बल 602% नफा; ‘देऊळ बंद 2’ नं आतापर्यंत किती कमावले? ठरला सर्वात मोठा हिट

आता ‘देऊळ बंद 2’ने कमाईचे नवे रेकॉर्ड रचले आहेत. हा चित्रपट आता मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.

Deool Band 2 Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर ( Box Office) मराठी चित्रपटांचा जबरदस्त दबदबा पाहायला मिळत आहे. अशात प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या चित्रपटाने एकामागून एक नवे विक्रम करताना दिसत आहे. काहीतरी या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी चित्रपट दमदार ओपनिंगसह चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन करताना दिसत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ' या चित्रपटाने दमदार सुरुवात केली. नंतर, 'राजा शिवाजी'च्या प्रदर्शनामुळे मराठी सिनेसृष्टीला मोठी चालना मिळाली आहे. आता ‘देऊळ बंद 2’ने कमाईचे नवे रेकॉर्ड रचले आहेत. हा चित्रपट आता मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.

70 कोटींचा टप्पा पार

‘देऊळ बंद 2’ला प्रदर्शित होऊन आता 30 दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने 30व्या दिवशी 29 लाखांचा टप्पा गाठलाय. नंतर शुक्रवारी आणि शनिवारी 1.10 कोटी व 98 लाख रुपये कमावले.  सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची स्पर्धा तुंबाडची मंजुळा या चित्रपटाशी सुरू आहे. आतापर्यंत चित्रपटाने भारतात 70.22 कोटींचे नेट कलेक्शन केले असून एकूण ग्रॉस कलेक्शन 82.85 कोटींवर पोहोचले आहे.

सर्वाधिक कमाई करणारा मराठीतील चौथ्या चित्रपट

या कमाईसह ‘देऊळ बंद 2’ने मराठी सिनेसृष्टीत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतात 70 कोटींचा टप्पा पार करणारा हा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर राजा शिवाजी (103.96 कोटी), दुसऱ्या क्रमांकावर सैराट (90 कोटी), तिसऱ्या क्रमांकावर बाईपण भारी देवा (76.28 कोटी) आणि चौथ्या क्रमांकावर ‘देऊळ बंद 2’ (70.22 कोटी) आहे.

शुक्रवारऐवजी गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची ओपनिंग काहीशी कमी होती. 2.89 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली. आठवड्याभरातच या चित्रपटाने 30.20 कोटी रुपयांचा आकडा गाठलेला. तर दुसऱ्या आठवड्यात 22.40 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. पुणे, मुंबई, नाशिक,नागपूर शहरांमध्ये या चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या आठवड्यातही 11.15 कोटींचा टप्पा गाठत चौथ्या आठवड्यात 6.22 कोटींवर हा चित्रपट आला. प्रदर्शनाच्या पाचव्या रविवारी 0.98 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले.  वीकेंडसह, इकडेच नाही हा चित्रपट पाहिला जातोय.

10 कोटींच्या बजेटवर 602% नफा

‘देऊळ बंद 2’चा बजेट केवळ 10 कोटी रुपये होतं. मात्र 70.22 कोटींच्या कमाईमुळे चित्रपटाने तब्बल 602% नफा कमावला आहे. त्यामुळे हा 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट ठरला आहे.‘देऊळ बंद 2’ हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद  या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिला भागही त्या काळात मोठा हिट ठरला होता. आता त्याचा सिक्वेलही तितकाच यशस्वी ठरत असून प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Talpade on Heart Attack: '10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
'10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
Atul Kulkarni Shares Video On Protest: कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Embed widget