Deepika Padukone : दीपिकासारख्या दिसणाऱ्या रिजुताला करावा लागतोय ट्रोलर्सचा सामना; दिली माहिती
सध्या दीपिका सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीची सोशल मीडियावर चर्चा आहे. तिचं नाव रिजुता घोष देब (Rijuta Ghosh Deb) असं आहे.
Rijuta Ghosh Deb On Haters On Social Media : बॉलिवूडधील सर्वांत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण (Deepika Padukone). दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. दीपिका तिच्या लुक्समुळे नेहमी चर्चेत असते. तिला अनेक नेटकरी सोशल मीडियावर फॉलो देखील करतात. सध्या दीपिका सारख्या दिसणाऱ्या एका तरुणीची सोशल मीडियावर चर्चा आहे. तिचं नाव रिजुता घोष देब (Rijuta Ghosh Deb) असं आहे. दीपिका सारख्या दिसणाऱ्या रिजुताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोंना पाहून नेटकरी देखील अवाक् झाले. आता एका मुलाखतीमध्ये रिजुतानं तिला येणाऱ्या अनुभवाबद्दल सांगितलं.
रिजुतानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ती लोकांच्या प्रतिक्रियेचा आदर करते. रिजुताचं अनेक लोक कौतुक करतात तर अनेक वेळा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. रिजुतानं संगितलं की अनेक वेळा तिला स्वत:च्या मानसिकआरोग्याची काळजी घेण्यासाठी सिलेक्टिव्ह रहावं लागतं.
रिजुता करते सोशल मीडियावरील ट्रोलर्सचा सामना
रिजुता पुढे म्हणाली, 'माझ्या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन फर्स्ट कॉपी, सस्ती दीपिका अशा कमेंट लोक करतात. मी या कमेंट्सकडे लक्ष देत नाही.' आलिया भट्ट सारखी दिसणारी सेलेस्टी बॅरागीचं उदाहरण देत रिजुता म्हणाली, 'सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा फायदा देखील आहे. मला आनंद होतो की लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची अशी संधी मिळते.' जेव्हा ओम शांती ओम हा दीपिकाचा चित्रपट रिलीज झाला तेव्हा रिजुता ही शाळेत होती. तेव्हापासूनच अनेक लोक, ती दीपिका सारखी दिसते, असं म्हणतं होते.
रिजुता ही डिजिटल क्रिएटर आहे. रिजुता ही कोलकाता येथे राहते. ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. रिजुताला इन्स्टाग्रामवर 56 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. तिनं आत्तापर्यंत 1,200 पेक्षा जास्त पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत.
हेही वाचा:
Deepika Padukone : 'सेम टू सेम'; दीपिकासारख्या दिसणाऱ्या तरुणीची सोशल मीडियावर हवा!