Dashavtar Movie Director Subodh Khanolkar On Dilip Prabhavalkar: 'दशावतार' सिनेमासाठी दिलीप प्रभावळकर नाहीतर, रजनीकांत होते पहिली पसंत? दिग्दर्शक म्हणाले...
Dashavtar Movie Director Subodh Khanolkar On Dilip Prabhavalkar: 'दशावतार' सिनेमासाठी दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) नाहीतर रजनीकांत (Rajinikanth) पहिली पसंत होते, अशी चर्चा रंगलेली. पण, खरं नेमकं काय?

Dashavtar Movie Director Subodh Khanolkar On Dilip Prabhavalkar: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) 'दशावतार' सिनेमाची (Dashavtar Movie) मोठी क्रेझ दिसून येत आहे. बॉक्स ऑफिसवरचे (Box Office Collection) कमाईचे आकडेही रेकॉर्ड ब्रेक करत आहेत. सिनेमानं दोनच दिवसांत कोट्यवधींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तसेच, सिनेमातले मुख्य अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी वयाच्या 81 व्या वर्षी केलेल्या कमाचंही प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. पण, जेव्हापासून 'दशावतार' सिनेमाची चर्चा रंगलेली, तेव्हापासूनच आणखी एक चर्चा जोरात होती. ती म्हणजे, 'दशावतार' सिनेमासाठी दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) नाहीतर रजनीकांत (Rajinikanth) पहिली पसंत होते. पण, आता याबाबत खुद्द सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर (Director Subodh Khanolkar) यांनी सांगितलं आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात बोलताना दिग्दर्शकांनी नक्की त्यांना सिनेमात कोणाला घ्यायचं होतं? याचं उत्तर दिलं आहे.
'दशावतार'साठी दिलीप प्रभावळकर नाहीतर, रजनीकांत होते पहिली पसंत?
'दशावतार' सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले की, "जर 'दशावतार' सिनेमाला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला तर ही गोष्ट गुंडाळून ठेवायची. कारण, ही गोष्ट इतर कोणीही सादर करू शकत नाही, हे आधीच ठरलं होतं. रजनीकांत नाव कुठून आलं मला माहीत नाही. पण, माझ्यासाठी दिलीप प्रभावळकर सर हे मराठीतील रजनीकांतपेक्षा कमी नाहीत. रजनीकांत वगैरे असा विचार आम्ही केला नव्हता..."
"या कथेची गरज अशी होती की यातला बाबुलीचा रोल हा वृद्ध दशावतारी कलाकाराचा आहे. आणि त्याला अभिनेता, व्यक्ती म्हणून प्रचंड व्हेरिएशन्स आहेत. त्याचे वेगळे लूक्सही आहेत. ही भूमिका तशी कठीण होती. हे सगळं प्रभावीपणे करू शकणारं दिलीप प्रभावळकर सर सोडून दुसरं कुणीच डोक्यात नव्हतं. त्यामुळे मी दिलीप प्रभावळकरांना विचारलं आणि पटकथा लिहायच्या आधीच मला त्यांच्याकडून होकार मिळाला", असंही त्यांनी सांगितलं.
View this post on Instagram
दरम्यान, 'दशावतार'मध्ये मुख्य भूमिकेत दिलीप प्रभावळकर झळकले आहेत. वयाची ऐंशी ओलांडलेल्या दिलीप प्रभावळकरांनी सिनेमात बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे. पण, त्यांनी साकारलेल्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिलीप प्रभावळकर यांच्याव्यतिरिक्त महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























