मराठी पटकथा लेखकांसाठी झी टॉकीजकडून 'टॉकीज कथायण चषक'; विजेत्याला मिळणार 'झी स्टुडिओ'सोबत काम करण्याची संधी
Zee Talkies : नव्या लेखकांना आपल्या कथा मोठ्या पडद्यावर पाहण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी झी टॉकीज वाहिनीमुळे मिळणार आहे.
Zee Talkies : मराठी चित्रपट वाहिनी, झी टॉकीजने आपल्या 'टॉकीज कथायण चषक' स्पर्धेचा दुसरा अध्याय मोठ्या उत्साहात सुरू केला आहे. झी टॉकीजच्या या स्पर्धेमुळे मराठीतील नवोदित पटकथा लेखकांना त्यांच्या कल्पनांना पंख लावण्याची अनोखी संधी मिळणार आहे. 2021 मध्ये झालेल्या 'टॉकीज कथायण चषक' च्या पहिल्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला होता आणि आता पुन्हा एकदा, अनेक नव्या लेखकांना आपल्या कथा मोठ्या पडद्यावर पाहण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी झी टॉकीज वाहिनीमुळे मिळणार आहे.
'टॉकीज कथायण चषक' ही स्पर्धा 18 वर्षांवरील प्रत्येकासाठी खुली आहे. या स्पर्धेत कोणत्याही शैलीतील पटकथा स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे लेखकांना आपल्या कथा लोकांसमोर आणण्याची चांगली संधी मिळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. इच्छुक स्पर्धकांना त्यांच्या कथा ई-मेलद्वारे talkieskathayan@zee.com यावर पाठवता येणार आहे. त्याशिवाय, स्पर्धेचे नियम आणि अटींसाठी https://zeetalkieskathayan.zee5.com/tnc.html या लिंकवर उपलब्ध आहे.
'टॉकीज कथायण चषक' ही स्पर्धा 18 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाली असून कथा पाठवण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे. विजेत्यांची घोषणा जानेवारी 2025 मध्ये 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? 2024' या पुरस्कार सोहळ्यात केली जाणार आहे. विजेत्याला 'झी टॉकीज' आणि 'झी स्टुडिओज' मध्ये पटकथा लेखक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याशिवाय, रोख बक्षीसही मिळणार आहे.
झी टॉकीज , झी युवा आणि झी चित्रमंदिर आणि झी स्टुडिओजचे बिजनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, "महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रतिभावान लेखकांना संधी देणं हे आमचं ध्येय आहे. त्यांच्या कथा जगासमोर आणून त्यांना मोठं व्यासपीठ मिळवून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. झी टॉकीजच्या 'टॉकीज कथायण चषक' उपक्रमांतून आम्ही या नव्या लेखकांना त्यांच्या गोष्टी चित्रपटांत रूपांतरित करण्याची संधी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
झी टॉकीजच्या 'टॉकीज कथायण चषक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी, https://zeetalkieskathayan.zee5.com/tnc.html या लिंकला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.