CID 2 : अखेर सीआयडीमधल्या अभिजीतचं स्वप्न पूर्ण होणार? मालिकेत तारिकासोबत लगीनगाठ बांधणार?
Abhijeet-Tarika Wedding : अखेर सीआयडीमधल्या अभिजीतचं स्वप्न पूर्ण होणार? मालिकेत तारिकासोबत लगीनगाठ बांधणार?

Abhijeet-Tarika Wedding : सीआयडी या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता सीआयडी मालिकेचा दुसरा सिझन येणार आहे. आता यामध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री होणार आहे. शिवाय सीआयडी ही मालिका आता ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर देखील पाहाता येणार आहे. सीआयडी सीझन 2 सुरू झाल्यापासून चाहत्यांमध्ये एपिसोड पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
तारिका आणि अभिजीतच्या लग्नाबाबतचा व्हिडिओ व्हायरल
नव्या सिझनचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लोक या शोमधील प्रत्येक पात्राला त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर त्यांच्या मालिकेतील नावाने ओळखतात. सीआयडीचा पहिला सीझन हिट झालाय. ज्यामध्ये अभिजीत आणि तारिका दिसले होते. तारिका आणि अभिजीतच्या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
एसीपी अभिजीतला म्हणतात, तारीकाशी लग्न कर...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एसीपी प्रद्युमन अभिजीतला रागाने म्हणतात की, तारीकाशी लग्न कर...हा व्हिडीओ पाहल्यानंतर प्रेक्षकांनी अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे. अभिजीत आणि तारीकाचं लग्न होणार असल्याचं चाहते म्हणत आहेत. मात्र, काही चाहते संभ्रमात पडले आहेत.
तुम्ही जर एवढा आग्रह करत असाल तर ठीक आहे, अभिजीतचं एसीपींना प्रत्युत्तर
अभिजीत आणि तारीका एसीपी प्रद्युमन अभिजीतला रागात बोलतात की, अभिजीत तुला लग्न करावे लागेल. तुला तारीकाशीच लग्न करावे लागेल. तारीकाचं नाव ऐकताच अभिजीतचा आनंद गगनात मावेनसा होतोय. तो अडखत म्हणतो की, तारीकाशी...हे काय म्हणत आहात सर तुम्ही ? मी थोडीफार चेष्टा करत असायचो. त्यानंतर एसीपी म्हणतात, अभिजीत तुला लग्न करावं लागेल. ..यानंतर अभिजीत म्हणतो, सर तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करत आहात. तुम्ही जर एवढा आग्रह करत असाल तर ठीक आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सीआयडीच्या पहिल्या सिझनचा आहे. त्यामुळे लोक संभ्रमात पडले आहेत. लोकांनी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
सीआयडी मालिकेत तारीकाची भूमिका श्रद्धा मुसळे हिने साकारली आहे. दरम्यान, सीआयडी 2 मध्ये आत्तापर्यंत तारीकाची एन्ट्री झालेली नाही. निर्माते हा सिझन पूर्ण करण्यासाठी काही नव्या चेहऱ्यांना घेऊन आले आहेत. चाहत्यांना तारीकाच्या पुनरागमनाची उत्सुकता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
HSC Exam Result 2025: कोकणची पोरं हुश्शार, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, मुंबईचा निकाल 92.93 टक्के
























