एक्स्प्लोर

Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Chowk Movie : 'चौक' हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chowk Movie Trailer Out : 'चौक' (Chowk) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरला 2,61,303 व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा ट्रेलर व्हायरल होत आहे. 

प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गल्लीत असतो आपला एक चौक! आपल्या चौकात असतात, जिवाभावाची आपली माणसं... अशाच जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेवर भाष्य करणारा 'चौक' हा सिनेमा आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 

'चौक' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, लोकांच्या गळ्यातील ताईत, तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये आणू शकतो तर मार्केटमधून घालवू पण शकतो, मार्केटमध्ये राहायचं असेल तर एवढं सहन करावं लागेल, असे दमदार डायलॉग या सिनेमात आहेत. 

'या' दिवशी चौक होणार प्रदर्शित! (Chowk Movie Release Date)

एप्रिल-मे मध्ये शाळांना सुट्या असल्याने अनेक मराठी सिनेमे या महिन्यांत प्रदर्शित होत आहेत. 5 मे ला प्रदर्शित होणारा 'बलोच' आणि 12 मे ला प्रदर्शित होणारा 'रावरंभा' या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळावा आणि मराठी चित्रपटांची आपापसात स्पर्धा होऊ नये यासाठी बहुचर्चित चौक या चित्रपटाने एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. चौक चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची 12 मे ही तारीख एक आठवडा पुढे घेतली आहे. आता हा चित्रपट 19 मे रोजी प्रदर्शित होईल.

सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी रिलीज डेट ढकलली पुढे 

मराठी सिनेमांमधील स्पर्धा टळावी यासाठी 'चौक' या सिनेमाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेत मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी उचललं हे विधायक पाऊल आहे. यासंदर्भात दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणाले की,"आमच्याच मित्रांचे बलोच आणि रावरंभा हे चित्रपट मे मध्ये प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी चौक चित्रपटाची 12 मे ही तारीख बदलून आता 19 मे करण्यात आली आहे". 

प्रविण तरडे म्हणाले की,"इतर चित्रपटांचा विचार करून, आमचा मित्र दयाने त्याचा 'चौक' हा चित्रपट एक आठवडा पुढे घेत एक अभिमानास्पद पाऊल उचललं आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन!’

पाहा ट्रेलर

संबंधित बातम्या

Baloch Trailer Launch: 'बलोच' चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न; चित्रपटात प्रवीण तरडे, स्मिता गोंदकर प्रमुख भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले
बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले
Kartam Bhugtam Review : अंधश्रद्धेवर भाष्य करणारा श्रेयस तळपदेचा 'करतम भुगतम'
अंधश्रद्धेवर भाष्य करणारा श्रेयस तळपदेचा 'करतम भुगतम'
Pune Murder : मध्यरात्री रस्त्यात अडवलं अन् सपासाप वार केले; पुण्यातील कोथरुडमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार
Pune Murder : मध्यरात्री रस्त्यात अडवलं अन् सपासाप वार केले; पुण्यातील कोथरुडमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार
Fact Check : लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य
Fact Check : लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadanvis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्यातील आरोप सत्य, मात्र अजित पवार दोषी नाहीत : फडणवीसHemant Godse Nashik : छगन भुजबळ नाराज नसून ते प्रचारात सक्रिय आहेत - हेमंत गोडसेPM Modi Raj Thackeray Sabha : राज ठाकरे आज 'लाव रे ते व्हिडीओ' म्हणतील ? मुंबईकरांची अपेक्षा काय ?Vaibhav Naik on Narayan Rane : राणेंना मत देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून पैशाचं वाटप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले
बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले
Kartam Bhugtam Review : अंधश्रद्धेवर भाष्य करणारा श्रेयस तळपदेचा 'करतम भुगतम'
अंधश्रद्धेवर भाष्य करणारा श्रेयस तळपदेचा 'करतम भुगतम'
Pune Murder : मध्यरात्री रस्त्यात अडवलं अन् सपासाप वार केले; पुण्यातील कोथरुडमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार
Pune Murder : मध्यरात्री रस्त्यात अडवलं अन् सपासाप वार केले; पुण्यातील कोथरुडमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार
Fact Check : लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य
Fact Check : लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
Prithviraj Chavan: भाजपला 250 जागा मिळतील, मोदींचा 'तो' सेल्फ गोल सत्ता निसटत चालल्याचं लक्षण: पृथ्वीराज चव्हाण
भाजपला 250 जागा मिळतील, मोदींचा 'तो' सेल्फ गोल सत्ता निसटत चालल्याचं लक्षण: पृथ्वीराज चव्हाण
HSC SSC Result : बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, दहावीचा निकाल कधी लागणार?
HSC SSC Result : दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकालाचं काम अंतिम टप्प्यात, जाणून घ्या अपडेट
Embed widget