एक्स्प्लोर

Chinmay Mandlekar : डोक्यावर भळभळती जखम, रक्त वाहत होतं पण..., चिन्मयने 'त्या' अभिनेत्याच्या स्पीरीटला केलं हॅट्स ऑफ;शेअर केला खास किस्सा

Chinmay Mandlekar : चिन्मयने एका नाटकारदरम्यान अभिनेत्याला झालेली जखम आणि त्यानंतरही त्याने सुरु ठेवलेलं नाटक याविषयीची एक किस्सा सांगितला आहे.

Chinmay Mandlekar : अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा त्याच्या अभिनयाने जितका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो तितकाच्या त्याच्या लिखाणामुळेही. सध्या चिन्मयने लिहिलेलं 'गालिब' या नाटकाची जोरदार चर्चा सुरु आहे. याच नाटकाला झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात नामांकंन होती. त्यानिमित्ताने चिन्मयने या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. पण यावेळी चिन्मयने नाटकादरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे. 

चिन्मयच्या एका नाटकामध्ये अभिनेत्याच्या डोक्याला जखम झाली होती. डोक्यातून रक्त वाहत होतं, पण तरीही त्याने नाटकाचा प्रयोग सुरु ठेवला. चिन्मयने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवरही त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रंगभूमी, मालिकाविश्व, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत चिन्मय त्याच्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आलाय. 

चिन्मयने सांगितला अभिनेत्याचा तो किस्सा

झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यादरम्यान चिन्मयची एक मुलाखत घेण्यात आली. यावेळी चिन्मयने त्याच्या एका नाटकादरम्यानचा प्रसंग सांगितला. यावर बोलताना चिन्मय म्हणाला की, 'नाटकाच्या तालमीत किंवा नाटकाच्या प्रयोगांमध्ये अनेक गमतीजमती आणि विनोदी किस्से घडत असतात. पण माझी जी एक आठवण आहे ती माझ्या एका सहकलाकाराबद्दलची आठवण आहे. तो सहकलाकार म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर.'       

तरीही तो प्रयोग पुढे घेऊन गेला - चिन्मय मांडलेकर

पुढे बोलताना चिन्मय म्हणाला की, आम्ही ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाचे प्रयोग करत होतो. ते नाटक खूप गाजलं होतं. एका प्रयोगामध्ये सिद्धार्थला ब्लॅकआऊटमध्ये नेमक कुठे जायचं हे कळलं नाही आणि तो स्टेजवरून खाली पडला. त्याच्यानंतर अख्खा प्रयोग त्याच्या डोक्यातून भळभळती जखम वाहत होती आणि ती जखम तशीच घेऊन त्याने पुढचा सगळा प्रयोग पूर्ण केला.तेव्हा आम्हा स्टेजवरच्या लोकांना खूप भीती वाटत होती की सिद्धार्थचं इतक रक्त वाहतंय, कदाचित तो चक्कर येऊनही पडू शकतो. पण अशा अवस्थेत सिद्धार्थने प्रयोग पूर्ण केला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर सिद्धार्थच्या या स्पीरीटसाठी हॅट्स ऑफ.' 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

ही बातमी वाचा : 

Bollywood Actress : लग्नाच्या 11 वर्षांनंतर तुटला संसार, आता वयाच्या 52 वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री घालणार दुसऱ्या लग्नाचा घाट?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमारMumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांगAjit Pawar Baramati : मला ही निवडणूक विकासाच्या मार्गावर न्यायची - अजित पवारSandip Deshpande Worli : लोकांनी ठरवलंय; आपल्याला उपलब्ध असलेल्या माणसाला मत द्यायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Embed widget