Bollywood Actress : लग्नाच्या 11 वर्षांनंतर तुटला संसार, आता वयाच्या 52 वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री घालणार दुसऱ्या लग्नाचा घाट?
Bollywood Actress Second Marriage : बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे.
Bollywood Actress Second Marriage : वयाच्या अवघ्या 17 व्या अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) हिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर या अभिनेत्रीच्या अभिनय क्षेत्रातला प्रवास सुस्साट सुरु झाला. आतापर्यंत अनेक हिट चित्रपट पूजाने आतापर्यंत दिले आहेत. मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) ते शाहरुख खानपर्यंत (Shah Rukh Khan) अभिनेत्रीने अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली आहे. पूजा भट्ट ही जितकी तिच्या कामामुळे चर्चेत आली तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. विशेष करुन या अभिनेत्रीच्या सिंगल आयुष्याची कायमच चर्चा होत असते.
दरम्यान पूजाला अनेकदा तिच्या दुसऱ्या लग्नाविषय़ी विचारण्यात येतं. पूजाने 2003 मध्ये मनीष माखिजासोबत लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर या जोडप्याचा संसार तुटला. तेव्हापासून पूजा तिचं सिंगल आयुष्य जगतेय. त्यामुळे चाहतेही तिच्या लग्नाविषयी वारंवार तिला विचारत असतात. या सगळ्यावर अभिनेत्रीने नुकतच एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.
पूजाने काय म्हटलं?
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजाने म्हटलं की, सगळे मला विचारतात की तुझं लग्न कधी होणार, तू सिंगल का आहेस. प्रत्येकवेळी अनेकजण माझी नवीन व्यक्तीशी ओळख करुन देतात. पण मी आता लग्न का करु? मला आता लग्नाची गरज नाही. सध्या तरी मी सिंगलच ठिक आहे. जर माझ्या नशिबात कोणी असेल तर ती व्यक्ती नक्कीच मला भेटेल.
लग्न जेव्हा व्हायचं तेव्हा होईल - पूजा भट्ट
यावर पुढे बोलताना पूजानं म्हटलं की, लग्न जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. एखाद्याला भेटण्याची गरज असते, तेव्हा ती व्यक्ती भेटतेच. पण फक्त एक माणूस सगळ्या गोष्टींवरचा उपाय नसतो. जीवनसाथी शोधण्यापेक्षा जोडीदार शोधणं महत्त्वाचं असतं. जर मला एक साथीदार मिळाला तर ती माझ्यासाठी सर्वोत्तम भेट असेल आणि जर मला तो मिळाला नाही तर मी माझे कुटुंब आणि माझे मित्र आनंदी आहेत'. सध्या पूजाच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram