एक्स्प्लोर

Vicky Kaushal Riteish Deshmukh Meet: 'छावा' भेटला ‘राजा शिवाजी’ला! विकी कौशल - रितेश देशमुख एकाच फ्रेममध्ये; खास भेटीची जोरदार चर्चा

‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे विशेष चर्चेत आलेल्या विकी कौशल यांनी नुकतीच रितेश विलासराव देशमुख यांची भेट घेतली.

Raja Shivaji Meet Chhava: 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाचित्रपट ‘राजा शिवाजी’च्या (Raja Shivaji) प्रदर्शनाच्या अगदी जवळ येत असताना, प्रेक्षकांसाठी एक खास आणि अविस्मरणीय क्षण समोर आला आहे. चित्रपटगृहांमध्ये हा भव्य चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता विकी कौशल आणि ‘राजा शिवाजी’मधून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे रितेश विलासराव देशमुख एकाच फ्रेममध्ये दिसले. या भेटीमुळे इतिहासप्रेमी आणि चित्रपटप्रेमींसाठी एक विशेष आकर्षण निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही या क्षणाची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. (Vickey Kaushal Riteish Deshmukh Meet)

विकी कौशलनं घेतली रितेश देशमुख यांची भेट 

‘छावा’ चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे विशेष चर्चेत आलेल्या विकी कौशल यांनी नुकतीच रितेश विलासराव देशमुख यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये ‘राजा शिवाजी’च्या निर्मितीप्रवासाविषयी, ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अशा भव्य चित्रपटाच्या निर्मितीमागील मेहनतीबाबत सखोल संवाद रंगला. तसेच विकी कौशल यांनी ‘राजा शिवाजी’च्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा देत, ऐतिहासिक विषयावर इतक्या भव्य स्वरूपात चित्रपट साकारण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

निर्मात्यांकडून येणार VIdeo

या चर्चेदरम्यान रितेश विलासराव देशमुख यांनी ‘राजा शिवाजी’साठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा चार वेगवेगळ्या भूमिका कशा सांभाळल्या, याविषयी मनमोकळेपणाने अनुभव शेअर केले. ऐतिहासिक विषयावर काम करताना घेतलेली तयारी, व्यक्तिरेखांच्या मांडणीत ठेवलेली बारकाई, तसेच द्विभाषिक चित्रपटाच्या चित्रीकरणातील आव्हाने आणि अनुभव याबाबत त्यांनी सविस्तर संवाद साधला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना एका चित्रपटासाठी एकत्र आणण्यामागील नियोजन आणि या भव्य प्रकल्पाची व्याप्ती याविषयीही त्यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.निर्मात्यांकडून या संवादाची केवळ एक झलक प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यात आली असून, विकी कौशल आणि रितेश विलासराव देशमुख यांच्या या खास भेटीचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही सांगितले जात आहे.


Vicky Kaushal Riteish Deshmukh Meet: 'छावा' भेटला ‘राजा शिवाजी’ला! विकी कौशल - रितेश देशमुख एकाच फ्रेममध्ये; खास भेटीची जोरदार चर्चा

'राजा शिवाजी'त दिग्गज कलाकारांची फळी 

‘राजा शिवाजी’मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भव्य फळी एकत्र आली आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांच्या प्रभावी उपस्थितीमुळे चित्रपटाची भव्यता अधिक वाढली आहे. या संपूर्ण टीमचे नेतृत्व रितेश विलासराव देशमुख करत असून, त्यांनी लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशा सर्वच जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत.

कधी होणार प्रदर्शित?

'जिओ स्टुडिओज'द्वारे सादर करण्यात आलेला आणि 'मुंबई फिल्म कंपनी'ची निर्मिती असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, संघर्ष, नेतृत्व आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास यावर आधारित हा ऐतिहासिक महाचित्रपट भारताच्या गौरवशाली इतिहासाला भव्य सिनेमॅटिक रूप देण्यास सज्ज आहे.‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भव्य दृश्यरचना, दमदार कथा, ऐतिहासिक भावविश्व आणि प्रेरणादायी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget