Chhaava Box Office Collection Day 25: 'छावा'ची मोठी झेप, पण अचानक लागला ब्रेक; बॉक्स ऑफिसवरची कमाई घटली, पण...
Chhaava Box Office Collection Day 25: 'छावा'नं 24 दिवसांत बक्कळ गल्ला जमवला, पण 25व्या दिवशी मात्र 'छावा'च्या कमाईत कमालीची घट दिसून आली.

Chhaava Box Office Collection Day 25: सध्या 'छावा' (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालत आहे. विक्की कौशल (Vicky Kaushal) - रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या 'छावा' चित्रपटानं 24 दिवसांत बक्कळ कमाई केली. 'छावा'नं एकामागून एक असे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले. पण, चौथा विकेंड संपताच चित्रपटाच्या कमाईत मात्र, मोठी पडझड पाहायला मिळाली. असं असलं तरीसुद्धा कमाईत घट होऊनंही 'छावा' भल्याभल्या दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडत आहे.
23 व्या दिवशी, शनिवारी, चित्रपटानं तेलुगू आणि हिंदीमध्ये एकत्रितपणे 17.01 कोटी रुपये कमावले, पण रविवारी, 24 व्या दिवशी, IND विरुद्ध NZ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामुळे चित्रपटाच्या कमाईत घट दिसून आली, लोकांनी चित्रपटापेक्षा क्रिकेटला प्राधान्य दिलं. त्यामुळे काहीप्रमाणात का होईना, 'छावा'ला फटका दिसल्याचं पाहायला मिळालं. 9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावेळी चित्रपटानं एकूण फक्त 10.65 कोटी रुपयांची कमाई केली. अशातच आता चित्रपटानं थिएटरमध्ये आपले 25 दिवस पूर्ण केले आहेत. अशातच चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
'छावा'नं 25 व्या दिवशी फक्त 10.65 कोटी रुपये कमावले होते. आज चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचा 25 वा दिवस आहे आणि चित्रपटाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत, जाणून घेऊया चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली? याबाबत सविस्तर...
View this post on Instagram
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'छावा'नं पहिल्या आठवड्यात 225.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटी कमावले. या चित्रपटानं चौथ्या आठवड्यात एकूण 36.59 कोटी रुपये कमावले, ज्यामध्ये हिंदीतून 28.43 कोटी रुपये आणि तेलुगूतून 8.16 कोटी रुपये कमावले. म्हणजेच 24 दिवसांत चित्रपटाचं एकूण कलेक्शन 533.51 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
25 व्या दिवशी चित्रपटाच्या आठवड्याच्या दिवसांमध्ये घट होत आहे. सुट्ट्या संपल्या की, पाहुण्यांची संख्या कमी होते. यामुळे, चित्रपटाचं आजचं कलेक्शन पुन्हा एकदा सिंगल डिजीटमध्ये पोहोचलं आहे. अशातच चित्रपटानं रात्री 10:30 वाजेपर्यंत 6.25 कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे एकूण 539.76 कोटी रुपये कमावले आहेत.
पठाण-अॅनिमलच्या रेकॉर्ड्स बरोबरी करणार 'छावा'?
2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पठाण' आणि 'अॅनिमल' यांनी अनुक्रमे 543.09 कोटी आणि 553.87 कोटी रुपये कमावले. छावाची कमाई आता निश्चितच कमी झाली आहे, पण सलमान खानचा सिकंदर प्रदर्शित होईपर्यंत दुसरा कोणताही मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छावाशी स्पर्धा करणार नाही. अशा परिस्थितीत, छावा पठाण आणि अॅनिमलचे रेकॉर्ड सहज मोडेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या चित्रपटात शंभू राजांची भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. तर, अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय रश्मिका मंदाना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह हेदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























