एक्स्प्लोर

'चरक'च्या टीझरने उडवली झोप; मृतदेह फाडून खाताना दिसतोय तांत्रिक; अंगावर काटा आणणारा थरार

चरक हा त्या भारताची कथा आहे, जिथे अनेकदा आस्था तर्कापेक्षा मोठी ठरते आणि विश्वास जीवन-मृत्यूसारख्या निर्णयांवरही प्रभाव टाकतो.

Charak Movie Teaser: बॉलीवूडचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या आगामी ‘चरक: आस्था का मेला’ या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. अवघ्या 52 सेकंदांच्या या टीझरमध्ये अंधश्रद्धा, तांत्रिक प्रथा आणि अंधभक्तीचं भयावह चित्रण पाहायला मिळतं. विशेष म्हणजे एका दृश्यात तांत्रिक मृतदेहाला फाडून खाताना दाखवण्यात आलं आहे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा येतोय. हा चित्रपट येत्या 6 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अंधश्रद्धेच्या काळ्या बाजूवर भाष्य

या चित्रपटाची कथा भारतातील ग्रामीण भागात पसरलेल्या अंधश्रद्धा आणि तांत्रिक मान्यतांभोवती फिरते. रहस्यमय ‘चरक मेळा’च्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ही गोष्ट अशा एका समुदायाची आहे, जो या उत्सवाला अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची अखेरची संधी मानतो. मेळ्यातील विधी आणि आस्थेचा उन्माद वाढत जातो तसं विश्वास, बळीआणि भक्तीबाबत अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न पुढे येताना दिसतात.

“चरक में लाशों की भेंट क्यों चढ़ाते हैं?”

टीझरमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला संवाद आहे “चरक में लाशों की भेंट क्यों चढ़ाते हैं?” यावर दिलेलं उत्तर आणखी धक्कादायक आहे. याच दृश्यात तांत्रिकाचा भयावह अवतार दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे टीझर पाहणारे हादरले आहेत. चित्रपट अंधश्रद्धा आणि भरकटलेल्या अध्यात्मावर तीक्ष्ण भाष्य करणार असल्याचं स्पष्ट होतं.

कलाकारांची दमदार फळी

या चित्रपटात अंजली पाटिल, सुब्रत दत्ता, नलनीश नील, शशिभूषण, शंखदीप आणि शौनक श्यामल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन शिलादित्य मौलिक यांनी केलं असून सुदीप्तो सेन प्रोडक्शन्सच्या सहकार्याने सिपिंग टी स्टुडिओजने निर्मिती केली आहे. PEN Studios प्रस्तुत हा चित्रपट राजेश भट्ट यांच्या सहनिर्मितीत तयार झाला आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी सांगितलं की, भारतीय रहस्यवादी आणि तांत्रिकांच्या जगाचा सिनेमॅटिक अनुभव म्हणून सादर करण्याची सर्जनशील प्रेरणा या चित्रपटामागे आहे. ही कथा मानवी मानसशास्त्राच्या खोल थरांपर्यंत पोहोचत साध्या माणसांना नैतिक द्वंद्वात अडकताना दाखावते असं ते म्हणाले.

चरक हा त्या भारताची कथा आहे, जिथे अनेकदा आस्था तर्कापेक्षा मोठी ठरते आणि विश्वास जीवन-मृत्यूसारख्या निर्णयांवरही प्रभाव टाकतो. हा चित्रपट आस्थेच्या अशा रूपाला दाखवतो, ज्यात बरे करण्याची ताकदही आहे, धैर्य देण्याची क्षमता आहे आणि नुकसान करण्याची शक्यताही आहे.असं या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले होते. टे पुढे म्हणतात, चरक अशी वास्तव कथा मांडते, जिथे विश्वास आणि त्याचे परिणाम समोर येतात आणि माणसाच्या मानवतेची कसोटी लागते. हा चित्रपट आस्थेशी जोडलेल्या अशा कृती दाखवतो, ज्यामुळे कोणालाही स्वतःच्या विचारांवर प्रश्न पडू शकतात. हा सिनेमा कोणाला योग्य किंवा अयोग्य ठरवत नाही, तर सत्य जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. असही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

72nd National Film Awards : 'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
Paresh Rawal On Amitabh Bachchan: 'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'

व्हिडीओ

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget