Ayres Sasaki Death : अपघात की घातपात? भिजलेल्या चाहत्याने मिठी मारताच प्रसिद्ध गायकाचा जागीच मृत्यू, भर कॉन्सर्टमध्ये काय घडलं?
Ayres Sasaki Death : राझिलियन गायक आयरेस सासाकी याचा एका कॉन्सर्टदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे.

Ayres Sasaki Death : लोकप्रिय ब्राझिलियन गायक आयरेस सासाकीचा (Ayres Sasaki) वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी मृत्यू झाला. सुरु कॉन्सर्टमध्येच आयरेसने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने एकच खळबळ माजली. त्याचा सॅलिनोपोलिसमधील सोलर हॉटेलमध्ये एक कार्यक्रम होता. तिथे परफॉर्म तरत असताना आयरसचे निधन झाले.
द मिरच्या वृत्तानुसार, या कार्यक्रमासाठी त्याचे काही नातेवाईकही उपस्थित होते. दरम्यान आयरसच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नाहीये. त्यामुळे त्याच्या जाण्याचा पत्नीला मोठा धक्का बसला आहे. पण आयरसचा मृत्यू होण्याआधी एका घटनेने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान विजेचा झटका लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण त्याचा मृत्यू हा एक अपघात होता की घातपात असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. कारण त्याचा परफॉर्मन्स सुरु असताना एक अशी गोष्टी घडली की त्यानंतर आयरेसचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आयरेसचा जेव्हा परफॉर्मन्स देत होता, त्यावेळी पूर्ण भिजलेला एक व्यक्ती स्टेजवर गेला. त्याने आयरला मिठी मारली. आयरस त्याला मिठी मारण्यासाठी पुढे जात असतानच त्याच्या जवळ असलेल्या एका केबलमध्ये विजेचा त्याला जोरदार झटका बसला. यामध्ये आयरेसचा मृत्यू झाला.
पोलिसांचा तपास सुरु
सध्या पोलीस या सगळ्या घटनांचा शोध घेत आहेत. कारण भर कॉन्सर्टमध्ये संपूर्ण भिजलेला असूनही हा चाहता स्टेजवर का गेला, यामागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये. त्याचप्रमाणे आयरेसच्या कॉन्सर्टमध्ये जे त्याचे नातेवाईक उपस्थित होते, त्यांनी देखील काही गोष्टींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, त्याच्या कार्यक्रमाची वेळ ठरली होती. पण ठराविक वेळेपेक्षा अधिक वेळ त्याचा कॉन्सर्ट सुरु ठेवण्यात आला होता. त्यामुळे नेमकं काय घडलं हे आम्ही देखील जाणून घेणार आहोत. त्यामुळे आयरेसचा मृत्यू हा एक अपघात होता की घातपात हे पोलिसांच्या तपासाअंती समोर येईलच.
View this post on Instagram























