![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Zeenat Aman : एकेकाळी दिवसाला असंख्य सिगारेट ओढले; पण आयुष्यात आलेल्या त्या गोष्टीने पुन्हा कधीच केला नाही स्पर्श
Zeenat Aman : झीनत अमान बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. अभिनेत्री एकेकाळी दिवसाला अनेक सिगारेट ओढत असे. पण अभिनेत्रीच्या आयुष्यात असा काही आनंद आला की तिने त्यानंतर कधीही सिगारेटला स्पर्श केला नाही.
![Zeenat Aman : एकेकाळी दिवसाला असंख्य सिगारेट ओढले; पण आयुष्यात आलेल्या त्या गोष्टीने पुन्हा कधीच केला नाही स्पर्श Zeenat Aman Shares Throwback Photo Smoking Cigarette With Dimple Kapadia Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Zeenat Aman : एकेकाळी दिवसाला असंख्य सिगारेट ओढले; पण आयुष्यात आलेल्या त्या गोष्टीने पुन्हा कधीच केला नाही स्पर्श](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/15/fdfd59689fbbb53eb959c8624533b7371715746859354254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Zeenat Aman : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) सध्या चर्चेत आहे. सिगारेट ओढण्यामुळे अभिनेत्री आता चर्चेत आली आहे. सिगारेट ओढणं आरोग्यासाठी हानीकारक आहे. पण श्रीमंत व्यक्तीपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच सिगारेट ओढायला आवडतं. बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांना सिगारेट ओढण्याचा शौक आहे. बॉलिवूडची एक अभिनेत्री दिवसाला असंख्य सिगारेट पीत असे. पण एकदिवस अभिनेत्रीच्या आयुष्यात असा काही आनंद आला की त्यानंतर तिने कधीही सिगारेटला स्पर्श केला नाही. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं नाव झीनत अमान आहे.
झीनत अमान 70-80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. झीनतने अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रसह बॉलिवूडच्या सर्वच हिट अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. झीनत अमान लोकप्रियतेच्या शिखरावर असताना खूपच स्टायलिश अभिनेत्री होती. अनेक पार्ट्यांमध्ये ती सिगारेट ओढताना दिसून यायची. एक दिवस झीनत अमानच्या आयुष्यात आनंद येतो. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही सिगारेट ओढली नाही. दिग्गज अभिनेत्रीने याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने सिगारेटचा किस्सा सांगितला आहे.
...म्हणून झीनत अमानने सिगारेट सोडली...
झीनत अमानने मंगळवारी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती दिग्दर्शक जॉय मुखर्जी आणि अॅक्ट्रेस डिंपल कपाडियासोबत दिसून आली होती. फोटोमध्ये झीनत अमान सिगारेट ओढताना दिसून आली होती. फोटो शेअर करत तिने त्याकाळच्या आठवणी सांगितल्या आहेत. तसेच डिंपल कपाडियाचंदेखील कौतुक केलं. पोस्ट शेअर करत झीनत अमानने लिहिलं आहे,"सिगारेट ओढताना मला पाहून प्रभावित होऊ नका. मी टीन एजच्या शेवी आणि 30 च्या दशकाच्या सुरुवातीला सिगारेट ओढत असे, याचा मी स्वीकार करते. पण जेव्ही मी प्रेग्नंट झाले तेव्हा सर्व काही संपलं". झीनत अमानची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
झीनत अमान शेवटची 2019 मध्ये आलेल्या 'पानीपत'मध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत होते. लवकरच ती बन टिक्की आणि मरगांव द क्लोज्ड फाइल्समध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने झीनत अमानने लाखो चाहत्यांना वेड लावलं आहे.
संबंधित बातम्या
Zeenat Aman : जनावरासारखं मारलं, डोळ्याला गंभीर जखम, हाडे फ्रॅक्चर झाली; झीनत अमानला निर्दयीपणे कोणी मारहाण केली?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)