एक्स्प्लोर

Zee Studio : 'हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावर झी स्टुडिओचा खुलासा; म्हणाले,"छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे..."

Har Har Mahadev : 'हर हर महादेव' सिनेमाच्या वादावर झी स्टुडिओने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.

Zee Studio On Har Har Mahadev : 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. 'हर हर महादेव' सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच  चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत अखेर वादावर मौन सोडलं. त्यानंतर आता सिनेमाच्या वादावर झी स्टुडिओने भाष्य करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

झी स्टुडिओने खुलासा करत एक पत्र शेअर केलं आहे. यात लिहिलं आहे,"छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता! त्यांची मूल्ये हृदयाशी बाळगूनच आपण वाटचाल केली आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी, त्यांचा इतिहास गैरपद्धतीने प्रेक्षकांसमोर पोहोचणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी घेतली आहे. तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि इतिहासाच्या अनेक प्रवाहांचा/ विचारांचा अभ्यास करुन, संदर्भ घेऊन आम्ही 'हर हर महादेव'ची निर्मिती केली आहे. आम्हाला विश्वास आहे, छत्रपती शिवराय आणि त्यांच्या वीर योद्धांप्रती आम्हाला असलेला आदर सिनेमा पाहणाऱ्यांना नक्कीच पटेल". 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

झी स्टुडिओने पुढे माफी मागत लिहिल आहे,"या चित्रपटाच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा शुद्ध हेतू आहे. सामान्य प्रेक्षकांवर झालेला हल्ला हा निर्षधार्ह आहे. आमच्या राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था प्रणालीवर संपूर्णपणे विश्वास आहे". 

'हर हर महादेव' सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे वादावर म्हणाले,"खरंतर आमचा जो स्टँड होता तो आम्ही सेन्सॉर बोर्डसमोर मांडला होता. आम्हाला सेन्सॉर बोर्डाने काही प्रश्न विचारले होते. त्यावेळी आम्ही संबंधित इतिहासाचे दाखले तिथे दिलेले आहेत. त्यानंतरच आम्हाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे फार काही बोलणार नाही. पण सिनेमागृहात घडलेला प्रकार लांच्छनास्पद आहे. थिएटरमध्ये काही लोकांनी घुसुन सिनेमा बघायला आलेल्या आपल्या मराठी माणसांना मारहाण केली. त्यांना शिविगाण केली. त्यांचे कपडे फाडले". 

संबंधित बातम्या

Har Har Mahadev: 'हर हर महादेव' चित्रपटाचा वाद ठाण्यात आणखी वाढणार? मनसेकडून आज विवियाना मॉलमध्ये स्पेशल शो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत धसांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 08 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : महाराष्ट्रातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा  : 03 February 2025 : ABP MajhaTop 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 03 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget