एक्स्प्लोर
गोळ्या खाऊन वजन कमी होत नाही, जिममध्ये मेहनत करावी लागते: जरीन खान
मुंबई: अभिनेत्री जरीन खाननं वजन घटविणाऱ्या गोळ्यांचा प्रचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. 'ज्या गोष्टीवर माझा स्वत:चा विश्वास नाही त्याचा मी कसा प्रचार करावा?' असा प्रश्न तिनं उपस्थित केला आहे.
जरीनच्य मते, "ज्या गोष्टींवर माझा विश्वास नाही त्याचा मी प्रचार करु शकत नाही. मी दररोज जीममध्ये जाते व्यायाम करते. कारण की, मला माहित की, वजन घटविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही."
जरीन खान दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या आगामी सिनेमा वीरप्पनमध्ये दिसून येणार आहे. 'खल्लास वीरप्पन' या गाण्यावर तिचा एक खास लूक पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, याचवेळी तिला वजन घटविणाऱ्या कंपनीनं संपर्क केला होता. त्याच्या जाहिरातीसाठी तिला जवळजवळ 1 कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र, तिनं ती ऑफर धुडकावून लावली. कारण जरीनचं म्हणणं आहे की, वजन कमी करण्याचा योग्य मार्ग म्हणजे जीममध्ये मेहनत करणं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
पुणे
विश्व
Advertisement