Zara Hatke zara Bachke: सारा आणि विकीच्या 'जरा हटके जरा बचके' चित्रपटानं पहिल्या दिवशी केली एवढी कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke) या चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...
Zara Hatke zara Bachke: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke zara Bachke) हा चित्रपट काल (2 जून) प्रेक्षकांच्या भेटीस आला. सारा आणि विकी यांच्या 'जरा हटके जरा बचके' या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...
तरण आदर्श यांनी एक ट्वीट शेअर करुन 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. या ट्वीटनुसार या चित्रपटानं पहिल्या दिवशी 5.49 कोटींची कमाई केली आहे. बाय-1-गेट-1 फ्रि या ऑफरमुळे तसेच तिकीटांच्या कमी किंमतीमुळे चित्रपटाला फायदा झाला आहे, असं म्हटलं जात आहे. आता हा चित्रपट दुसऱ्या दिवशी किती कमाई करतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
#ZaraHatkeZaraBachke takes off on Day 1… Silences naysayers and pessimists, who had predicted [below] ₹ 2 cr start… Got a boost due to Buy-1-Get-1 free ticket offer + affordable ticket pricing, which has given its biz the required push… Fri ₹ 5.49 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) June 3, 2023
The… pic.twitter.com/tFhk996o6Y
'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा रिव्ह्यू अनेकांनी सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटामधील विकी आणि सारा यांच्या केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे. विकी आणि सारासोबतच 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
'जरा हटके जरा बचके' चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
फिर और क्या चाहिये, तेरे वास्ते, बेबी तुझे पाप लागेगा या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक नेटकरी या गाण्यांवरील रिल्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: