एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापूरचा जावई अंबाबाई चरणी, झहीर-सागरिका देवीच्या दर्शनाला
नवदाम्पत्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकला.
कोल्हापूर: टीम इंडियाचा माजी मध्यमगती गोलंदाज आणि कोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं.
नवदाम्पत्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी माथा टेकला.
झहीर आणि ‘चक दे इंडिया’ गर्ल सागरिका यांनी गेल्या आठवड्यात 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह झाला.
पाहा आणखी फोटो : झहीर खान-सागरिका घाटगे अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरात
त्यानंतर त्यांनी काल कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला.
झहीर खान आणि सागरिका यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
झहीर-सागरिकाच्या रिसेप्शन पार्टीत कोहलीचा डान्स
झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नाचं रिसेप्शन 28 नोव्हेंबरला मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज यावेळी उपस्थित होते. रिसेप्शन पार्टी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली.
या रिसेप्शनमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, आशिष नेहरा, युवराज सिंह, अजित आगरकर यांसह अनेक आजी-माजी क्रिकेटर हजर होते. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या ‘विरानुष्का’ या जोडीवर.
यावेळी विराट आणि अनुष्काने त्या पार्टीत चांगलाच ठेका धरला होता.
संबंधित बातम्या
झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!
झहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये ‘विरानुष्का’चा डान्स
झहीर खान आणि सागरिका घाटगे रिलेशनशिपमध्ये?
फोटो : सागरिका घाटगेविषयी ‘या’ सात गोष्टी तुम्हाला माहित आहेत?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रीडा
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement