KGF 2 Release Date: प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली; KGF-2 'या' दिवशी रिलीज होणार
सुपरस्टार यशने सोशल मीडिया पोस्ट शेअर करून चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि रिलीज डेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
KGF 2 Release: कोरोना महामारीमुळे 'केजीएफ 2' (KGF 2) चित्रपटाची रिलीज डेट सतत पुढे ढकलण्यात येत होती. प्रेक्षक मात्र या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण बऱ्याच काळानंतर बहुप्रतिक्षित चित्रपट 'केजीएफ 2' ची रिलीज डेट सर्वांसमोर आली आहे. कन्नड सुपरस्टार यश याने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. रिलीज डेट समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
यशने सोशल मीडिया पोस्ट शेअर करून चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि रिलीज डेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आजच्या अनिश्चिततेमुळे आमच्या संकल्पनेला उशीर होईल. मात्र जसं वचन दिलं होतं, त्या प्रमाणे होईल. आम्ही 14 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात येणार आहोत. यशची ही पोस्ट सोशल मीडियावर येताच व्हायरल झाली आहे.
The uncertainties of today will only delay our resolve, but the eventuality is as promised.We will be out in theaters on april 14th 2022.#KGF2onApr14@prashanth_neel @VKiragandur @hombalefilms @duttsanjay @TandonRaveena @SrinidhiShetty7 pic.twitter.com/2FPTknM7Nb
— Yash (@TheNameIsYash) August 22, 2021
सिनेमात अधीराची महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संजय दत्तने देखील सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. KGF 2 चा ट्रेलर रिलीज होऊन बराच काळ लोटला आहे. अशा स्थितीत चाहते यशच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. KGF Chapter 1 देखील चाहत्यांना चांगलाच आवडला आणि देशभरात या चित्रपटाबद्दल चर्चा झाली. आता 'KGF 2' हा चित्रपट संपूर्ण भारतात 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. KGF चा पहिला भाग 2018 मध्ये रिलीज झाला होता. कन्नड, तामिळ, तेलगू आणि हिंदीमध्ये आलेल्या या चित्रपटाने अनेक विक्रम केले. 250 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा हा पहिला कन्नड चित्रपट होता. त्याच वेळी, हा चौथा हिंदी डब चित्रपट होता, ज्याने सर्वाधिक कमाई केली.