एक्स्प्लोर
... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या वादाचा शोला मोठा फटका बसला. बॉलिवूड स्टार्सही आता प्रमोशनसाठी या शोकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या वादानंतर कपिलचा शो चांगलाच संकटात सापडला. एकीकडे कपिलच्या शोचा टीआरपी दिवसेंदिवस घसरतोय, तर दुसरीकडे बॉलिवूड स्टार्सही कपिलपासून दूर जाताना दिसत आहेत.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कपिलचा चांगला मित्र म्हणून ओळखला जातो. 'द कपिल शर्मा शो'च्या सुरुवातीपासूनच अक्षय कुमार त्याच्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जात होता. मात्र यावेळी अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळल्याचं दिसून आलं.
'टॉयलेट एक प्रेम कथा' या सिनेमाचं अक्षय कुमारने मोठ्या प्रमाणात प्रमोशन केलं. मात्र तो कपिलच्या शोमध्ये गेला नाही. कपिलच्या शोचा टीआरपी कमी झाल्यामुळे अक्षय कुमार त्याच्या शोमध्ये गेला नाही का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
सलमान खाननेही त्याच्या 'ट्यूबलाईट' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माला निवडलं नाही. त्याने सुनील ग्रोव्हरसोबत सोनी टीव्हीवर स्पेशल शो केला होता. सलमानच्या शोमुळे कपिलचा शो ऑनएअर गेला नव्हता.
गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या स्टार्सना कपिलच्या शोमध्ये गेल्यानंतर शूटिंग न करताच परतावं लागल्याचे प्रसंग घडले. शाहरुख खान त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये गेला होता. मात्र कपिल शर्माची प्रकृती बिघडल्याने त्याला शूटिंग न करताच परतावं लागलं होतं.
कपिल शर्माच्या शोमध्ये काही मोठे बदल केले जाणार असल्याचंही बोललं जात आहे. कारण गेल्या आठवड्यातील टीआरपी रेटिंगमध्ये कपिलचा शो विसाव्या क्रमांकावर आहे. दरम्यान सोनी टीव्हीने कपिल सोबतचं कॉन्ट्रॅक्ट एका वर्षासाठी वाढवलं आहे. त्यामुळे हा शो बंद होणार, या चर्चांना पूर्ण विराम लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement