Jaya Bachchan : "लग्नानंतर रोमान्स संपतो"; जया बच्चन यांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
Jaya Bachchan : जया बच्चन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत "लग्नानंतर रोमान्स संपतो", असं वक्तव्य केलं आहे.
Jaya Bachchan : जया बच्चन (Jaya Bachchan), श्वेता बच्चन (Shweta Bachchan) आणि नव्या नंदा (Navya Nanda) यांच्या 'व्हाट द हेल, नव्या' या पॉडकास्टचा नवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या सीझनचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये जया बच्चन लग्नाबद्दल भाष्य करताना दिसत आहेत.
जया बच्चन यांचा 'व्हाट द हेल, नव्या' या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन लग्नाबद्दल भाष्य करताना दिसत आहे. तसेच त्या 'जया-इंग' या शब्दाचा अर्थ सांगताना दिसत आहेत. लग्नानंतर रोमान्स संपतो, असंही त्या म्हणाल्या आहेत.
View this post on Instagram
नव्या नंदाला 'जया-इंग' या शब्दाचा अर्थ सांगताना जया बच्चन म्हणाल्या,"जया-इंग' या शब्दाचा अर्थ दिशादर्शक असा आहे. प्रोमो आऊट झाल्याने प्रेक्षकांना आता या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे.
नव्या नंदाने केली 'व्हाट द हेल, नव्या'सीझन 2'ची घोषणा
पॉडकास्टच्या प्रीमियरआधी नव्या नंदाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"व्हाट द हेल नव्या'च्या नव्या सीझनसाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही गप्पांमध्ये खूप गुंतलो आहोत. आई आणि आजीसोबतचा नवा सीझन तुमच्या भेटीसाठी सज्ज आहे".
'या' कारणाने अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबत केलेलं लग्न
'कौन होणार करोडपती'च्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न करण्याचं कारण सांगितलं होतं. ते म्हणाले होते,"जयाचे केस लांबलचक असल्याने मी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता". जया बच्चन आणि अमिताभ बच्चन ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. अमिताभ आणि जया 3 जून 1973 रोजी लग्नबंधनात अडकले. आता पुढल्या वर्षी अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता संसाराच्या 50 वर्षानंतर अमिताभ यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न केल्याचं कारण सांगितलं आहे. जया बच्चन यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
संबंधित बातम्या