एक्स्प्लोर

Pathaan : शाहरुख खानच्या 'पठाण'चं बजेट काय? किंग खानचं मानधन ऐकून हैराण व्हाल

Pathaan Movie : शाहरुख खानच्या बहुचर्चित 'पठाण' या सिनेमाचं शूटिंग आठ देशांमध्ये झालं आहे.

Shah Rukh Khan Pathaan Budget : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमचा (John Abrham) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून आजही बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुखचं आहे. शाहरुखच्या अभिनयापासून ते सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्सपर्यंत वेगवेगळ्या कारणाने हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता सात झाले असले तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे. या सिनेमाचं शूटिंग कुठे झालंय, सिनेमासाठी शाहरुखने किती मानधन घेतलं आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 

'या' ठिकाणी झालंय 'पठाण'चं शूटिंग (Pathaan Shooting Venue)

यशराजच्या बॅनरखाली 'पठाण'ची निर्मिती करण्यात आली आहे. यशराज नेहमीच त्यांच्या सिनेमाचं शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी करत असतात. 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगसाठीदेखील त्यांनी खूप अभ्यास केला आहे आणि वेगवेगळ्या जागांची निवड केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आठ देशांमध्ये 'पठाण' सिनेमाचं शूटिंग झालं आहे. यात स्पेन, यूएई, भारत, तुर्की, फ्रान्स या प्रमुख देशांचा समावेश आहे. 

'पठाण' सिनेमाचं बजेट काय आहे? (Pathaan Movie Budget) 

'पठाण' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. एखाद्या हॉलिवूड सिनेमाप्रमाणे या सिनेमाची बांधणी करण्यात आली आहे. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने जगभरात 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. पण या सिनेमाची निर्मिती फक्त 250 कोटींमध्ये करण्यात आली आहे. एकंदरीतच बजेटपेक्षा खूपच जास्त कमाई या सिनेमाने केली आहे. उत्कृष्ट दर्जाच्या वीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारतीय सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमाने भारतात 328 कोटींची कमाई केली आहे. येत्या दिवसांत या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आणखी वाढ होणार आहे. 

'पठाण' सिनेमासाठी शाहरुखने किती मानधन घेतलं आहे? (Shah Rukh Khan Fees)

'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. 'पठाण'आधी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला त्याचा 'झीरो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर शाहरुखने चार वर्षांनी 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा निर्णय घेतला. या सिनेमासाठी त्याने 60 कोटी मानधन घेतलं आहे. तर दीपिका पादुकोणने 15 कोटी, जॉन अब्राहमने 20 कोटीचं मानधन घेतलं आहे. तर या सिनेमात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचीदेखील झलक पाहायला मिळत आहे. पण या सिनेमासाठी सलमानने मानधन घेतलेलं नाही. 

'पठाण' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार!

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'पठाण' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 100 कोटींमध्ये या सिनेमाचे ओटीटी राइट्स अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने विकत घेतले आहेत. सध्या जगभरात 'पठाण' सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. 

संबंधित बातम्या

Pathaan: रेकॉर्डब्रेक कमाईनंतर 'पठाण'च्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; रिलीजच्या सहाव्या दिवशीच तिकीट दरात घट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Raj Thackeray: काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar on Congress :  मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 'स्वबळाचा' नारा: महाविकास आघाडीत तणाव! उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून नाराजी व्यक्त
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka Congress Crisis: डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
डीके आणि सीएम सिद्धरामय्यांची ब्रेकफास्ट पे चर्चा! दोघांमधील खूर्ची वादावर आता तरी 'ब्रेक' लागणार?
Raj Thackeray: काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत; सुधीर मुनगंटीवारांचं नाव न घेता राज ठाकरेंचा गिरीश महाजनांना खोचक टोला
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा तुघलकी फतवा! या 19 गरीब देशातील निर्वासितांना नो एन्ट्री; नव्याने कोणाला हाकलून देणार ते सुद्धा सांगितलं
Palghar News: सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
मोठी बातमी! सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र
Chhatrapati Sambhajinagar: कल्पनाचा अफगाणी बॉयफ्रेंड अन् अमित शाहांच्या तोतया ‘ओएसडी’ला दिल्लीमध्ये अटक; रात्री उशिरा केली कारवाई, चौकशीदरम्यान तीची उडवाउडवीची उत्तरं
कल्पनाचा अफगाणी बॉयफ्रेंड अन् अमित शाहांच्या तोतया ‘ओएसडी’ला दिल्लीमध्ये अटक; रात्री उशिरा केली कारवाई, चौकशीदरम्यान तीची उडवाउडवीची उत्तरं
Sayaji Shinde on Nashik tree Cutting: झाडं आमची आई-बाप आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंनी नाशिकच्या तपोवनात लढाईचं रणशिंग फुंकलं
झाडं आमची आई-बाप आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंनी नाशिकच्या तपोवनात लढाईचं रणशिंग फुंकलं
Kolhapur News: कोल्हापुरात आरोग्यमंत्र्यांचे रौद्ररूप, अचानक सीपीआर रुग्णालयात भेट देत अधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले, तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती?
कोल्हापुरात आरोग्यमंत्र्यांचे रौद्ररूप, अचानक सीपीआर रुग्णालयात भेट देत अधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले, तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती?
Embed widget