एक्स्प्लोर

विशेष रिपोर्ट : 'संजू' चित्रपटातून आपण काय शिकणार?

संजय, सलमानसारख्या स्टार्सनी केलेल्या चुका एक मोठा वर्ग मोठ्या मनानं पोटात घालतो. तीच क्षमाशील वृत्ती आपल्या माणसांनी केलेल्या चुका माफ करताना का येत नाही?

मुंबई : संजय दत्त... आर्म्स अॅक्टखाली पाच वर्ष तुरुंगवास भोगलेला संजय दत्त.. त्याचं अख्खं आयुष्य काल्पनिक चित्रपटापेक्षा जास्त वादग्रस्त. ज्यात लव्ह, सेक्स, क्राईम, कॉमेडी, ट्रॅजेडीचा रंग खच्चून भरला आहे. त्यामुळेच राजकुमार हिरानीनं संजू हा विषय हातात घेतला, त्यात काहीच विशेष नाही. संजू रिलीज झाल्यानंतर टीका टिपण्ण्या सुरु झाल्या. एका गुन्हेगाराचं, ज्याचे संबंध अतिरेक्यांशी, डी गँगशी होते, त्याचं इतकं ग्लोरिफिकेशन कशाला? असा सूर एका वर्गानं लावला. संजूवर काहींनी चक्क जाहीर बहिष्कारही घातला. केवळ सुनील दत्त बाप असल्यानेच संजय दत्त यातून सहीसलामत सुटल्याच्या कमेंटही आल्या. कधी नव्हे ते राजू हिरानींनाही चाहत्यांनी टार्गेट केलं. पण त्यानंतरही संजूनं 3 दिवसात 100 कोटीची कमाई केली. संजय दत्तचं आयुष्य एखाद्या थरारपटासारखं आहे. तो ड्रॅग अॅडिक्ट आहे. त्याचे गुन्हेगारी जगताशी जवळचे संबंध आहेत. मैत्रिणींचा आकडा तर संजूलाही नीट सांगता येणार नाही. समाजानं जी जी गोष्ट अनैतिक मानलीय, त्याचा प्रत्येक पॅरामीटर संजय दत्तनं पूर्ण केला. नव्हे तो त्यात मेरीटमध्ये आला. मग खरंच संजय दत्तच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याची गरज होती? खरंच संजयच्या आयुष्यातून घेण्यासारखं, अनुकरण करण्यासारखं काय आहे? कारण राजू हिरानींचा चित्रपट मनोरंजनासकट तगडा मेसेज घेऊन येतो हा इतिहास आहे. संजूचं आयुष्य रोलर कोस्टर राईड होतं. त्याच्या स्वत:साठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी अगदी त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येकासाठी. ड्रग्जमधून बाहेर पडला, तर तो 93 च्या बॉम्बस्फोटात अडकला, तिथून मग गुन्हेगारी जगताशी गहिरं नातं जडलं. जेलमध्ये गेला, बाहेर आला.. पण त्याला कुणी वाऱ्यावर सोडलं नाही.. संजूसारखं आयुष्य उधळून देऊन जगण्याचं पोटेन्शियल आपल्या आजूबाजूच्या शेकडो लोकांमध्ये असतं. पण त्यांना चुकांसकट, गुन्ह्यांसकट स्वीकारण्याची तयारी फक्त एखाद्या सुनील दत्तमध्ये, प्रिया दत्तमध्ये किंवा मग त्याच्याशी जोडलेल्या काही मित्रांमध्ये असते. बॉलिवूडनंही केवळ तुरुंगवास भोगलाय, म्हणून त्याला अंतर दिलं नाही. बेफिकीर असतानाही चांगले रोल त्याला मिळाले. संजूनं त्याचं सोनंही केलं हे विसरता येणार नाही. संजय दत्तच्या आयुष्याचं असेसमेंट प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणं करेल. कुणी शिव्या घालेल, कुणी कौतुक करेल. पण जगण्याचा, आपलं आयुष्य मांडण्याचा त्याचा अधिकार समाज म्हणून आपणही नाकारु शकत नाही. संजय, सलमानसारख्या स्टार्सनी केलेल्या चुका एक मोठा वर्ग मोठ्या मनानं पोटात घालतो. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सलमान तिसऱ्या रांगेत होता. ते आपण सहन करतो. तीच क्षमाशील वृत्ती आपल्या माणसांनी केलेल्या चुका माफ करताना का येत नाही? संजू फिल्म त्याच्या आयुष्यावर जितके प्रश्न उपस्थित करते, त्यापेक्षा अधिक प्रश्न आपल्याला विचारते.

महत्त्वाच्या बातम्या

Welcome to the jungle Review: अक्षय कुमारसोबत दिग्गजांची मादियाळी, 'वेलकम टू द जंगल' सिनेमा पाहायचा की नाही?
अक्षय कुमारसोबत दिग्गजांची मादियाळी, 'वेलकम टू द जंगल' सिनेमा पाहायचा की नाही?
Actress Krishi Thapanda: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात तरुणानं आयुष्य संपवलं, लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; घटनेवेळी 'ती' कुठे होती?
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात तरुणानं आयुष्य संपवलं, लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; घटनेवेळी 'ती' कुठे होती?
Maharashtra Epstein Files Marathi Movie: 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम
Ashok Samel Ani Kashinath Ghanekar Worst Movie: ''आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा सिनेमा अत्यंत वाईट आणि खोटा...'; ज्येष्ठ अभिनेत्याच्या वक्तव्यानं मराठी सिनेसृष्टी हादरली
''आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा सिनेमा अत्यंत वाईट आणि खोटा...'; ज्येष्ठ अभिनेत्याच्या वक्तव्यानं मराठी सिनेसृष्टी हादरली

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Hasan Mushrif: 'ती' क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो, एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही; सतेज पाटलांचा खोचक टोला
'ती' क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवतो, एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास होत नाही; सतेज पाटलांचा खोचक टोला
राम मंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवरच डल्ला मारला, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अखेर एफआयआर दाखल, पण चंपत राय, डॉ. अनिल मिश्रांची नावेच नाहीत! संजय सिंह म्हणाले, हेच सर्वात मोठे चाेर
राम मंदिरातील कोट्यवधींच्या देणगीवरच डल्ला मारला, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अखेर एफआयआर दाखल, पण चंपत राय, डॉ. अनिल मिश्रांची नावेच नाहीत! संजय सिंह म्हणाले, हेच सर्वात मोठे चाेर
Maharashtra Epstein Files Marathi Movie: 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम
Sanjay Raut : शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता? अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून ना पावती, ना कुठली माहिती; संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले...
शिवसेनेने दान केलेली 4 किलो वजनाची चांदीची वीट बेपत्ता? अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून ना पावती, ना कुठली माहिती; संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले...
Sandeep Deshpande on Sanjay Dina Patil: संदीप देशपांडेंनी संजय दिना पाटलांच्या 'त्या' गाडीचे फोटो दाखवले, बड्या गुन्ह्यातील फरार आरोपीसोबतचा फोटो दाखवत गंभीर आरोप
संदीप देशपांडेंनी संजय दिना पाटलांच्या 'त्या' गाडीचे फोटो दाखवले, बड्या गुन्ह्यातील फरार आरोपीसोबतचा फोटो दाखवत गंभीर आरोप
Ritu Tawde Mumbai: रितू तावडेंच्या दौऱ्यावेळी 'तो' मुकादम मुद्दाम गटारात पडल्याचा संशय? महापौरांकडून चौकशीचे आदेश
रितू तावडेंच्या दौऱ्यावेळी 'तो' मुकादम मुद्दाम गटारात पडल्याचा संशय? महापौरांकडून चौकशीचे आदेश
Mumbai Local Train : वाद झाल्यानंतर प्रवाशांनी दोघांना वेगळं केलं, पण बॅगेत चाकू असल्याचं आठवलं अन्...; लोकल मधील 'त्या' 39 सेकंदांचा थरार! रोशन सुवर्णाकडे चाकू कसा आला? पोलिसांसमोर खुलासा
वाद झाल्यानंतर प्रवाशांनी दोघांना वेगळं केलं, पण बॅगेत चाकू असल्याचं आठवलं अन्...; लोकल मधील 'त्या' 39 सेकंदांचा थरार! रोशन सुवर्णाकडे चाकू कसा आला? पोलिसांसमोर खुलासा
Maharashtra Rain Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, विदर्भासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कुठे कसे असेल हवामान, IMDचा अंदाज काय?
राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, विदर्भासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; कुठे कसे असेल हवामान, IMDचा अंदाज काय?
Embed widget