एक्स्प्लोर
अक्षयसोबत रोमँटिक सिनेमा करायचा आहे: ईशा गुप्ता

मुंबई: अभिनेत्री ईशा गुप्ताला आता अभिनेता अक्षय कुमारसोबत रोमँटिक सिनेमात काम करायचं आहे. ईशाचं म्हणणं आहे की, तिला जर अक्षयसोबत अशा सिनेमात काम करायला मिळालं तर तिच्या करिअरचं लक्ष्य नक्कीच यशस्वी होईल. 'झूम' चॅनलवरील शो दिवाली बीट्समध्ये ईशानं सांगितली की, 'मला खरोखरच अक्षयसोबत रोमँटिक सिनेमात काम करायचं आहे. ज्यामध्ये मी साडी नेसली आहे आणि अभिनेता माझ्यासाठी गाणं गात असून आम्ही झाडांजवळ डान्स करीत आहोत.' अशा सिनेमात काम मिळाल्यास आपलं जीवन सार्थक झाल्याचं वाटेल आणि आपल्या सिनेमा करिअरमध्ये आपण संतुष्ट होऊ असं तिचं म्हणणं आहे. राज-३ची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अक्षय कुमारची मोठी फॅन होती. 'रुस्तम'मधील अक्षयसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल ईशा म्हणते की, 'ज्या दिवशी मला समजलं की, मला अक्षयसोबत काम करायचं आहे. तेव्हा मी फारच उत्साहीत झाली. पण ज्यावेळी मला कळलं की, मी त्याची अभिनेत्री नाही तेव्हा माझी थोडी निराशा झाली होती.'
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























