एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू
सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या ‘वळू’ सिनेमातील बैलाचा मृत्यू झाला आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या ‘वळू’ चित्रपटात या बैलाची ‘डुरक्या’ नावाची भूमिका होती. सांगलीच्या पांजरपोळ संस्थेत राजा नावाने हा बैल ओळखला जायचा. याच संस्थेत राजाने अखेरचा श्वास घेतला.
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वळू’ चित्रपटातील डुरक्या हे एका बैलाचे पात्र लोकप्रिय झाले होते. या वळू बैलाच्या जोरावर या चित्रपटाने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारही मिळविले होते.
तब्बल तीनशे किलो वजन, लालसर डोळे, जाडजूड शिंगे अशा शरीरयष्टीचा हा वळू मूळचा सांगलीतील होता. तब्बल तीनशे वळूंमधून दिग्दर्शकाने त्याची निवड केली होती. मागील काही वर्षांपासून त्याची सांगलीच्या पांजरपोळ संस्थेत देखभाल केली जात होती. अनेक गाई, वासरे यांच्यासह काही भाकड जनावरासोबत तो या संस्थेत राहत होता. मात्र, आजारपणामळे वृद्ध झाल्यानेया बैलाचे निधन झाले.
17-18 वर्षे गाठलेल्या या वळूने मागील काही दिवसांपासून आजारपणामुळे खाणे-पिणे सोडले होते. यामुळे त्याचे वजन दोनशे किलोपर्यंत घटले होते. वृद्ध झाल्याने उपचारास साथ मिळत नव्हती आणि अखेर त्याची।प्राणज्योत मालवली. पांजरपोळ संस्थेत गरजणारा भारदस्त आवाज हरपला. या संस्थेचे या बैलावरील प्रेम त्याम्च्या मरणानंतरही कमी झाले नाही. म्हणून तर या संस्थेने या वळू बैलाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement