एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिनेता विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांकडून सुरक्षा वाढवली
धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे. धमकी देणारा व्यक्ती कोण आहे, कुठून आला आहे, काय धमकी दिली आहे, याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.
मुंबई : वादग्रस्त ट्वीट केल्यानंतर अडचणीत आलेल्या विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे. धमकी देणारा व्यक्ती कोण आहे, कुठून आला आहे, काय धमकी दिली आहे, याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.
बुधवारी विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बुधवारी फिल्म इंडस्ट्रीच्या काही लोकांसाठी विवेकचा आगामी 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक 24 मे रोजी प्रदर्शित होत आहे. एक्झिट पोलवरुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबाबत मीम शेअर करुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता विवेक ओबेरॉयने माफी मागितली होती. तसंच ट्विटरवर शेअर केलेलं मीमही त्याने डिलीट केलं होतं. विवेक ओबेरॉयने सोमवारी (20 मे) तीन फोटोंचं एक मीम आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केलं होतं. यानंतर त्याच्यावर चौफेर टीका झाली होती. मीमचे ओपिनियन पोल, एक्झिट पोल आणि निकाल असे तीन भाग होते. ओपिनियन पोलमध्ये ऐश्वर्या सलमान खानसोबत दिसत होती. एक्झिट पोलमध्ये विवेक ओबेरॉयसोबत आणि निकालामध्ये ती अभिषेक बच्चन आणि आराध्यासोबत दिसत आहे. ऐश्वर्या आणि तिची मुलगी असलेलं मीम शेअर केल्याने विवेक ओबेरॉयवर सर्व स्तरावरुन जोरदार टीका झाली. तसंच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीस पाठवली आहे. संबंधित बातम्याMaharashtra: Actor Vivek Oberoi has been provided security by Mumbai police today, after he had received threats. pic.twitter.com/hlreq0X0ku
— ANI (@ANI) May 22, 2019
विवेक ओबेरॉयचा माफीनामा, ट्विटरवरुन वादग्रस्त मीम डिलीट
चोराच्या उलट्या बोंबा, विवेक ओबेरॉयकडून 'त्या' ट्वीटचं समर्थन
एक्झिट पोलबाबत विवेक ओबेरॉयच्या ट्वीटमधून ऐश्वर्याची खिल्ली, विवेकवर टीकेचा भडीमार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement