एक्स्प्लोर
युवराजच्या लग्नात विराट-अनुष्काची जोडीने हजेरी
पणजी : गुरुद्वारामध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर आता सिक्सर किंह युवराज सिंह आणि अभिनेत्री हेडस कीच गोव्यात हिंदू धर्मानुसार विवाहबद्ध झाले. युवराजच्या लग्नासाठी टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीही कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत गोव्यात दाखल झाला.
अनुष्का आणि विराटला मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. युवीने क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांना लग्नाचं निमंत्रण दिलं होतं. दिल्लीमध्ये 7 डिसेंबरला युवराजने रिसेप्शनचं आयोजन केलं आहे.
यापूर्वी 30 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपल्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळेंसह सर्व खेळाडू युवराजच्या लग्नात सहभागी झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement