एक्स्प्लोर
विराट आणि अनुष्काचा नव्या वर्षात साखरपुडा?
डेहराडून : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का लवकरच साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. नववर्षात विराट आणि अनुष्का साखरपुडा करतील, असं म्हटलं जात आहे. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी विराट आणि अनुष्का सध्या उत्तराखंडमधील नरेंद्रनगरच्या हॉटेल आनंदामध्ये आहेत. महत्त्वाचं म्हणजे विराट आणि अनुष्काच्या साखरपुड्याला बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात साखरपुडा विराट आणि अनुष्का मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नव्या वर्षात दोघांचा सारखपुडा होईल असं म्हटलं जात आहे. ज्या हॉटेलमध्ये दोघे थांबले आहेत, तिथे नातेवाईंकाचा राबता वाढत आहे. एका वृत्तपत्रानुसार, या दोघांच्या साखरपुड्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावतही 1 जानेवारीला इथे पोहोचणार आहे. मात्र साखरपुड्याबाबत अनुष्का आणि विराटकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाले नाही. विशेष म्हणजे विराट कोहली उत्तराखंडचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.
Before You Go
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव






















