![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Vikrant Rona : 'विक्रांत रोणा' ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई; जाणून घ्या कलेक्शन
Vikrant Rona : विक्रांत रोणा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
![Vikrant Rona : 'विक्रांत रोणा' ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई; जाणून घ्या कलेक्शन vikrant rona box office collection day 10 know kichcha sudeep movie collection Vikrant Rona : 'विक्रांत रोणा' ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई; जाणून घ्या कलेक्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/c776fdef950944ce4965cbd85013af3e1659849509_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vikrant Rona box office collection : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeep) विक्रांत रोणा (Vikrant Rona) हा चित्रपट 28 जुलै रोजी रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत. पण तरी देखील विक्रांत रोणा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रांत रोणा' या चित्रपटानं 150 कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 8.14 कोटींची कमाई केली आहे. ओपनिंग-डेला या चित्रपटानं 1.11 कोटींची कमाई केली. एका रिपोर्टनुसार, विक्रांत रोणा या चित्रपटानं दहाव्या दिवशी तीन कोटींची कमाई केली. लवकरच हा चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सामील होईल, असंही म्हटलं जात आहे.
#VikrantRona #Hindi performs much better than many *dubbed #Hindi films* released in the recent past... Thu 1.11 cr, Fri 93 lacs, Sat 1.52 cr, Sun 2.21 cr [revised], Mon 70 lacs, Tue 66 lacs, Wed 57 lacs, Thu 44 lacs. Total: ₹ 8.14 cr. #India biz. Note: HINDI version. NBOC. pic.twitter.com/QDEiWUar7D
— taran adarsh (@taran_adarsh) August 5, 2022
‘विक्रांत रोणा’ ही एका गावाची कहाणी आहे, जिथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. याच भीतीला समूळ नष्ट करण्यासाठी विक्रांतची (किच्चा सुदीप) गावात एन्ट्री होते. या चित्रपटात ‘विक्रांत’ एका धाडसी पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे.
किच्चा सुदीपसोबतच 'विक्रांत रोणा' या चित्रपटामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. निरुप भंडारी, नीता अशोक, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. हा चित्रपट इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित आहे.
वाचा सविस्तर बातमी:
Kiccha Sudeep : 'एका गावातील प्रत्येक घरात माझा फोटो, लोक पूजा करतात'; किच्चा सुदीपनं सांगितला अनुभव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)