एक्स्प्लोर

Vikram Vs Samrat Prithviraj: ‘विक्रम’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ‘सम्राट पृथ्वीराज’लाही टाकले मागे! पाहा किती गल्ला जमवला...

Vikram Vs Samrat Prithviraj: बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' 3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर, कमल हासनचा बहुचर्चित 'विक्रम' देखील याच दिवशी प्रदर्शित झाला आहे.

Vikram Vs Samrat Prithviraj: बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) 3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर, कमल हासनचा (Kamal Haasan) बहुचर्चित 'विक्रम' (Vikram) देखील याच दिवशी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर पाहायला मिळाली आहे. प्रदर्शनापूर्वी अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाविषयी बरीच चर्चा निर्माण झाली होती. पण, तो प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे विशेष आकर्षित करू शकला नाही.

'सम्राट पृथ्वीराज'ने पहिल्या दिवशीच संथ सुरुवात केली होती. त्यानंतर वीकेंडमध्येही फारशी प्रगती दिसून आली नाही. तर, दुसरीकडे कमल हासनचा 'विक्रम'  तिकीट बारीवर धमाल करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेली कमाई पुढे कायम ठेवली.

'सम्राट पृथ्वीराज' संथगतीने सुरु

यशराज बॅनरचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट जगभरात 5000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. तर, भारतात 3750 स्क्रीन्सवर रिलीज झाला. चित्रपटाने शुक्रवारी 10.70 कोटी, शनिवारी 12.60 कोटींचा गल्ला जमवला. तर काही रिपोर्ट्स नुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास 16.20 कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने 3 दिवसात 39.50 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशीची अधिकृत कमाई वेगळी असल्यास, यात बदलही होऊ शकतो.

'सम्राट पृथ्वीराज'मध्ये अक्षय-मानुषीसोबत सोनू सूद आणि संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.

'विक्रम'ची धडाकेबाज कामगिरी

कमल हासनच्या 'विक्रम' चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती. 'विक्रम'चे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. कमल हासनसोबत या चित्रपटात विजय सेतुपती आणि फहाद फासिल यांचा समावेश आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 32.05 कोटी, शनिवारी 28.70 कोटींची कमाई केली आहे. अंदाजे आकडेवारीनुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास 31 कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 91.75 कोटी इतके आहे. तर, आजच्या दिवसात अर्थात सोमवारी हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो. जागतिक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Dharau Poster: लहान मुलगा अन् त्याची गाय, हळव्या नात्याची खास झलक; 'धाराऊ'चं पोस्टर आऊट, कधी होणार चित्रपट रिलीज?
लहान मुलगा अन् त्याची गाय, हळव्या नात्याची खास झलक; 'धाराऊ'चं पोस्टर आऊट, कधी होणार चित्रपट रिलीज?
Ajay Devgn Reaction On Tukaram Mundhe: कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
Kiara And Siddharth Second Child: 'कुणीतरी येणार गं...' कियारा अडवाणी अन् सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा होणार आई-बाबा; प्रेग्नेंसीची घोषणा, पोस्टने वेधलं लक्ष
'कुणीतरी येणार गं...' कियारा अडवाणी अन् सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा होणार आई-बाबा; प्रेग्नेंसीची घोषणा, पोस्टने वेधलं लक्ष
Amitabh Bachchan on Hairs And Height: 'कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही...'; अमिताभ बच्चन यांची उंची पाहून घाबरायचे मेकर्स, केस वाढवण्यामागचं कारणही सांगितलं
'कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही...'; अमिताभ बच्चन यांची उंची पाहून घाबरायचे मेकर्स, केस वाढवण्यामागचं कारणही सांगितलं

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
Rohit Pawar on MPSC protest Court order: हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Rohini Khadse Vs Chitra Wagh : काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली; आत्ता उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या, 'MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या...'
Pune MPSC Protest: प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
Raju Shetti: शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Embed widget