एक्स्प्लोर

दीपिका पदुकोणच्या एक्स-बॉयफ्रेंडचा थाटात विवाह, भारतातून पळालेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याची हजेरी

Siddharth Mallya Net Worth : कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा मुलाचा शानदार लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे. सिद्धार्थ मल्ल्याची एकूण मालमत्ता किती, ते सविस्तर जाणून घ्या.

मुंबई : भारतातून पळालेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा मुलगा अभिनेता सिद्धार्थ मल्ल्याचा शानदार विवाहसोहळा पार पडला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्ल्याने गर्लफ्रेंड जास्मिनसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उद्योगपती विजय मल्ल्याचा मुलगा अभिनेता-मॉडेल सिद्धार्थ मल्ल्या,  22 जून 2024 रोजी त्याची गर्लफ्रेंड जास्मिनसोबत विवाहबंधनात अडकला आहे. सिद्धार्थने लग्नाच्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत. 

कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा मुलाचा शानदार लग्नसोहळा

सिद्धार्थ मुल्ल्या आणि जास्निन यांची ग्रॅन्ड वेडिंग पार पडली. दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने लग्नगाठ बांधली. 22 जून रोजी सिद्धार्थ आणि जास्मिन यांनी हिंदू धर्माच्या विधींनी सात फेरे घेतले. त्यानंतर दोघांनी 23 जून रोजी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. या दोन्ही पद्धतीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अभिनेता सिद्धार्थ मल्ल्या अडकला विवाहबंधनात

सिद्धार्थ मल्ल्याने त्याची गर्लफ्रेंड जस्मिनसोबत लग्न केलं आहे. सिद्धार्थ आणि जास्मिन एका वर्षाहून अधिक काळ एकमेकांना डेट करत होते. लंडनमध्ये सिद्धार्थचा लग्नसोहळा पार पडला आहे. सिद्धार्थ मल्ल्याचे वडील विजय मल्ल्याच्या हवेली 'लेडीवॉक' येथे हा शानदार विवाहसोहळा पार पडला. अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थित या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

सिद्धार्थ मल्ल्याच्या लग्नाचे फोटो समोर

वडील विजय मल्ल्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त सिद्धार्थ मल्ल्याने अनेक क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली आहे. सिद्धार्थ मल्ल्या एक अभिनेता आणि मॉडेल सुद्धा आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सिद्धार्थने डियाजिओ येथे गिनीजसाठी सहाय्यक ब्रँड व्यवस्थापक म्हणून काम केलं. यानंतर सिद्धार्थने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल क्रिकेट संघाच्या संचालकाची भूमिका साकारली. 

सिद्धार्थ मल्ल्याचं दीपिका पदुकोणसोबतच्या रिलेशनची चर्चा

सिद्धार्थ मल्ल्याच्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतच्या रिलेशनमध्ये होता नात्याची खूप चर्चा झाली होती. दोघेही काही काळ एकमेकांना डेट करत होते. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले होते. याशिवाय 2011 मध्ये आयपीएल सामन्यादरम्यान सिद्धार्थने खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये दीपिकाला किस केल्याने त्यांचं नातं चर्चेत आलं होतं. मात्र, दोघांनी काही काळाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

सिद्धार्थ मल्ल्याची एकूण संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023 पर्यंत सिद्धार्थ मल्ल्याची एकूण संपत्ती अंदाजे 380 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 3,175 कोटी रुपये होती. बिझनेस, एंटरटेनमेंट आणि मॉडेलिंग यामधून त्याने ही कमाई केली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget