एक्स्प्लोर
VIDEO: 'नसीब का खोटा पर हुनर में खरा', रितेशच्या 'बँजो'चा टीझर रिलीज
![VIDEO: 'नसीब का खोटा पर हुनर में खरा', रितेशच्या 'बँजो'चा टीझर रिलीज Video Riteish Deshmukh And Nargis Fakhri Starrer Banjos Teaser Released VIDEO: 'नसीब का खोटा पर हुनर में खरा', रितेशच्या 'बँजो'चा टीझर रिलीज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/30161745/Banjo-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित आगामी 'बँजो' चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. 'बँजो'द्वारे रवी जाधव बॉलिवूडमद्ये पदार्पण करत असून मराठमोळा रितेश देशमुखची यात प्रमुख भूमिका आहे. 'नसीब का खोटा पर हुनर मे खरा,' असं म्हणत रितेश समोर येतो. सिनेमात रितेशसह नर्गिस फाकरी मुख्य भूमिकेत दिसेल.
आणि 'बँजो'साठी रितेश देशमुखने गटारात उतरुन सीन दिला
अभिषेक बच्चनच्या आवाजात रितेशच्या भूमिकेची ओळख करुन देण्यात आली आहे. सिनेमात नर्गिस फाकरीचा मराठमोळा अंदाज दिसेल. "इस का हाथ किसी पे पडे तो आदमी हिल जाता है, और बँजो पे पडे तो भी आदमी हिल जाता है….बँजो की दुनिया का बच्चन", या वाक्यावर रितेशची एन्ट्री होते. ‘बँजो कलाकार हे गेल्या 100 हून अधिक वर्षांपासून मुंबईचा अविभाज्य भाग आहेत. मात्र त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. बँजोवादक सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता काम करतात. त्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या आमच्या हिरोने त्याच्या कलेतूनच कशी उभारी घेतली, हे आम्हाला दाखवायचं होतं. सगळेच हिरो बाईक, कार किंवा घोड्यावरुन स्क्रीनवर एन्ट्री घेतात, माझा हिरो गटारातून येईल’ असं दिग्दर्शक रवी जाधवने 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. https://twitter.com/Riteishd/status/737213840627109889अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)