Vicky Kaushal : जेव्हा ऐन लग्नसराईत कतरिनानं विकीला दिली होती लग्न न करण्याची धमकी, विकी कौशलने सांगितला किस्सा
Vicky Kaushal Wedding Story : अभिनेता विकी कौशलने कतरिना आणि त्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. कतरिनाने त्याला लग्न न करण्याची धमकी दिली होती.
मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे बॉलिवूड इंटस्ट्रीमधील चर्चित कपलपैंकी एक आहे. चाहते या कपलला भरभरुन प्रेम देतात. कतरिनाने सध्या करिअरमधून ब्रेक घेतला आहे, तर विकी त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी छावा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत त्याने खुलासा केला होता की, लग्नाच्या आधी कतरिना त्याच्यावर खूप भडकली होती आणि तिने लग्न न करण्याची धमकीही दिली होती.
जेव्हा कतरिनानं विकीला दिली होती लग्न न करण्याची धमकी
अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) 2021 मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यांनी रिलेशनशिपही खूप सीक्रेट ठेवलं होतं. हे दोघं डेट करत असल्याचंही कुणाली माहित नव्हतं, न कधी हे दोघं एकत्र दिसले होते, त्यामुळे जेव्हा या दोघांच्या लग्नाची बातमी समोर आली, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सध्या विकी आणि कतरिना एक हॅप्पी मॅरिड कपल आहेत. दरम्यान, विकीने त्यांच्या लग्नाच्या आधीचा एक किस्सा सांगितला आहे, जेव्हा कतरिनाने त्याला लग्न न करण्याची धमकी दिली होती.
View this post on Instagram
विकी कौशलने सांगितला किस्सा
विकीने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याने लग्नापूर्वी त्याच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे अर्धे शूटिंग पूर्ण केलं होतं आणि लग्नानंतर दोन दिवसांतच त्याला कामावर परतावं लागणार होतं. ही गोष्ट कतरिनाला कळल्यावर तिने थेट त्याच्याशी लग्न न करण्याची धमकी दिली होची. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत विकीने सांगितलं होतं की, "मी माझ्या लग्नाआधी चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण केलं होतं आणि त्यानंतर मी लग्नासाठी सुट्टी घेतली होती. लग्नानंतर लगेचच दोन दिवसांत ते मला सेटवर बोलवत होते. त्यानंतर मला कतरिनाने धमकी दिली की, जर तुला लग्नानंतर दोन दिवसांनी सेटवर जायचं आहे, तर लग्न करुच नकोस. मग मी सेटवर जायला नकार दिला आणि लग्नानंतर पाच दिवसांनी सेटवर गेलो."
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :