प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन
शशिकला जवळकर यांचा जन्म सोलापुरमध्ये 1932 मध्ये झाला होता. आज त्यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे आज दुपारी वयाच्या 88 व्या वर्षी मुंबईतील कुलाबा येथील घरी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणे बंद केले होते.
शशिकला जवळकर यांचा जन्म सोलापुरमध्ये 1932 मध्ये झाला होता. शशिकला यांनी 'सुजाता', 'आरती', 'अनुपमा', 'पत्थर और फूल', 'आई मिलन की बेला', 'गुमराह', 'वक्त', 'खूबसूरत', 'छोटे सरकार', अशा शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्तम सहायत अभिनेत्री म्हणून शशिकला यांनी चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत, शशिकला यांनी करण जोहरच्या मल्टीस्टारर चित्रपट कभी खुशी कभी गम या चित्रपटात विशेष भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी 'बादशाह', 'चोरी चोरी', 'परदेस' या चित्रपटांतही काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त शशिकला अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये आई आणि सासूच्या भूमिकेतही दिसल्या आहेत.
अभिनेत्री शशिकला यांच्यासोबत काही चित्रपटात काम करणारे अभिनेता प्रेम चोप्रा एबीपी न्यूजला म्हणाले, की "शशिकला खूप चांगली अभिनेत्री होती. तिने चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून विविध भूमिका साकारल्या, त्यांनी चरित्रसह अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. कोणतीही भूमिका त्या सहज साकाराची. ती एक अष्टपैलू अभिनेत्री होती मला आजही आठवते.