एक्स्प्लोर
माझ्यावर सहाव्या वर्षी बलात्कार झाला: अभिनेत्री डेझी इराणी
डेझी इराणींच्या वेदनांना तब्बल 60 वर्षांनी आवाज मिळालाय.

मुंबई: ज्यांनी वयाची साठी-सत्तरी ओलांडलीय, त्यांना अभिनेत्री डेझी इराणी नक्की आठवत असेल.
कुरळ्या केसांची, मोठ्या डोळ्यांची बाहुलीसारखी दिसणारी डेझी इराणी. जिनं नया दौर, बूट पॉलिश, जागते रहो, धूल का फूल अशा अनेक चित्रपटांमध्ये राज कपूर, किशोर कुमार, दिलीप कुमार, देव आनंद, मीना कुमारी यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली..
पण त्याच डेझी इराणींच्या वेदनांना तब्बल 60 वर्षांनी आवाज मिळालाय.
सहा वर्षांच्या असताना आणि हम पंछी है एक डाल के या चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना त्यांच्यावर बलात्कार झाला. त्यांचे कौटुंबिक संबंध असलेल्या एका व्यक्तीनं तत्कालिन मद्रासमध्ये हे कृत्य केलं.
सध्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर खूप बाल कलाकार दिसतात. त्यांच्या टॅलेंटला वावही मिळतोय. पण त्यांच्या सुरक्षेची काळजी त्यांच्या आप्तस्वकियांनी, आई-वडिलांनी नीट घ्यावी, हे सुचवण्यासाठी त्यांनी आपली आपबिती जगासमोर उघड केली. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही घटना सविस्तरपणे कथन केली.
डेझी इराणी यांनी नेमकं काय म्हटलं?
तो माणूस आता जिवंत नाही, तो गेला. त्याचं नाव नझीर होतं. सुप्रसिद्ध गायिका जोहराबाई अंबालेवाली यांचा तो नातेवाईक होता. त्यामुळे साहजिकच त्याचे फिल्म जगतात उत्तम संबंध होते.
माझ्या आईला कोणत्याही परिस्थितीत मला फिल्मस्टार झालेलं पाहायचं होतं. मी ‘बेबी’ या मराठी सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
नझीर काका त्यावेळी मद्रासमध्ये सुरु असलेल्या ‘हम पंछी एक डाल के’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी माझ्यासोबत आला होता.
मला तो अख्खा प्रसंग तुकड्या तुकड्यांत आठवतोय. पण ती जीवघेणी वेदना अजूनही माझ्या जशीच्या तशी आठवणीत आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी जसं काही झालंच नाही, अशा भावात पुन्हा स्टुडिओत आले. नझीरनं काय केलं, हे आईला सांगण्याची हिंमत मला बरीच वर्ष झाली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बातम्या
सांगली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
