एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

कादर खान यांच्या निधनाची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वायरल होत होती. मागील काही दिवसांपासून कादर खान यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑल इंडिया रेडीओने आपल्या ट्विटरवर त्यांचं निधन झालं असल्याचं ट्वीट केल्याने कादर खान यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे कॅनडातील टोरंटो येथे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. ते दीर्घ आजारानं ग्रस्त असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने ही माहिती दिली. मागील  16-17 दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना कॅनडाची नागरिकता मिळाली होती. 2015-16 साली ते कॅनडामध्ये स्थायिक झाले होते. तिथेच्या त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. कादर खान यांच्या निधनाची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वायरल होत होती.  मागील काही दिवसांपासून कादर खान यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑल इंडिया रेडीओने आपल्या ट्विटरवर त्यांचं निधन झालं असल्याचं ट्वीट केल्याने कादर खान यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. यापूर्वीही अनेक वेळा कादर खान यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. पुन्हा  या गोष्टीची पुनरावृती झाल्याने संताप व्यक्त केला जात होता. प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम करणं बंद केलं होतं.  गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. चालल्यास आपण खाली पडू याची भीती कादर खान यांना वाटत होती. त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. कादर खान यांची कारकिर्द कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी काबूलमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, नाट्यलेखनाची आवड होती. 1973 मध्ये 'दाग' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  चार दशकांमध्ये 300हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून होतं. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर तर 2013 मध्ये त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rahul Vaidya On Intimacy Remark: बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
बायकोसोबतचं बेडरुम सिक्रेट, राहुल वैद्य सर्वांदेखत खासगी क्षणांबद्दल बोलून गेला, पत्नीही हादरली, नेटकरी चिडले... VIDEO
Nana Patekar in Khashaba: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमात नाना पाटेकर? कोणती भूमिका साकारली?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमात नाना पाटेकर? कोणती भूमिका साकारली?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रो फायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रो फायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Embed widget