DDLJ: सिमरन आणि राजच्या प्रेमाची जादू मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहता येणार; डीडीएलजे होणार रिलीज
डीडीएलजे (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटामधील राज आणि सिमरन यांच्या प्रेमकथेनं अनेक तरुणांच्या मनात घर केलं. आता ही प्रेमकथा पुन्हा रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Dilwale Dulhania Le Jayenge: 'बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है', 'अगर ये तुझे प्यार करती है तोह यह पलट के देखेगी. पलट.. पलट!' या एव्हरग्रीन डायलॉग्सनं सजलेला डीडीएलजे म्हणजेच दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात. मराठा मंदिर या चित्रपटगृहात हा चित्रपट बघण्याची मजा काही औरच! या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामधील राज आणि सिमरन यांच्या प्रेमकथेनं अनेक तरुणांच्या मनात घर केलं. आता ही प्रेमकथा पुन्हा रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
व्हॅलेंटाईन वीकच्यानिमित्तानं डीडीएलजे चित्रपट पुन्हा रुपेरी पडद्यावर रिलीज करण्याचा निर्णय यशराज फिल्म्सनं घेतला आहे. याबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन यशराज फिल्म्सनं ही माहिती सिनेप्रेमींना दिली आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस या चित्रपटगृहातमध्ये दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपट 10 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे.
यशराज फिल्म्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'डीडीएलसोबत पुन्हा प्रेमात पडा. 10 फेब्रुवारीपासून पुढील एक आठवडा थिएटरमध्ये पाहता येणार डीडीएलजे हा व्हॅलेंटाईन वीक पीव्हीआर,आयनॉक्स आणि सिनेपोलीसोबत साजरा करा. आता तुमचं तिकीट बुक करा. '
View this post on Instagram
1995 मध्ये दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होऊन 28 वर्ष झाली आहेत. हा चित्रपट आदित्य चोप्रानं (Aditya Chopra) दिग्दर्शित केला. या चित्रपटाची निर्मीती यशराज फिल्मनं केली आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) राज ही भूमिका साकारली तर अभिनेत्री काजोलनं (Kajol) सिमरन ही भूमिका साकारली. तसेच या चित्रपटात अमरीश पुरी, फरीदा जलाल, अनुपम खेर यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. आता हा चित्रपट पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: