Urvashi Rautela Video: ‘कही पे निगाहे.. कही पे निशाना!’, ऋषभ पंतच्या वाढदिवशीच उर्वशी रौतेलाची खास पोस्ट!
Urvashi Rautela Video: अभिनेत्री उर्वशी रौतेलाने काही वेळापूर्वी तिच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कॅमेराकडे पाहत फ्लाईंग किस देताना दिसली आहे.
Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील सोशल मीडिया वॉर नेहमीच चर्चेचा विषय ठरला. उर्वशी आणि ऋषभ यांच्या नात्याची चर्चा देखील जोरदार रंगली होती. मात्र, त्यांच्यातील वादामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. पण, या वादांना काहीच दिवस उलटत होते की, पुन्हा एकदा ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आली. इतक्या वादानंतरही उर्वशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक अशी पोस्ट शेअर केली, ज्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने काही वेळापूर्वी तिच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कॅमेराकडे पाहत फ्लाईंग किस देताना दिसली आहे. या व्हिडीओसोबत तिने कॅप्शनमध्ये 'हॅपी बर्थडे' असे लिहिले आहे. मात्र, या पोस्टमध्ये तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नसला, तरी नेमका आजच्याच दिवशी अर्थात 4 ऑक्टोबर क्रिकेटपटू ऋषभ पंत याचाही वाढदिवस आहे.
पाहा व्हिडीओ :
या व्हिडीओत उर्वशीने सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या चमकदार लाल ड्रेसमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे. उर्वशीने या व्हिडीओमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कुणालाही टॅग केलेलं नाही. मात्र, तिच्या या शुभेच्छा ऋषभ पंतसाठीच असल्याचा अंदाज चाहते चाहते बांधत आहेत. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया...
उर्वशीने जरी नाव घेतले नसले तरी तिने शुभेच्छा ऋषभलाच दिल्या आहे, असे चाहत्यांचे मत आहे. चाहते देखील या व्हिडीओवर भरपूर कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘वहिनी आज ऋषभ दादाचा वाढदिवस आहे.’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘भावांनो आज ऋषभ पंतचा वाढदिवशी आहे. प्रत्येकाला उर्वशीसारखी मैत्रीण भेटली पाहिजे. तिचं डेडीकेशनतर बघा..’
उर्वशी-ऋषभचा वाद चर्चेत
नुकताच सोशल मीडियावर उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातील वाद पाहायला मिळाला होता. एका मुलाखतीत उर्वशीने ऋषभ पंतचा उल्लेख केला होता. तर, यावरून चिडलेल्या ऋषभ पंतने तिला ‘ताई बस कर.. आता अजून किती खोटं बोलशील’ असा टोला लगावला होता. यावर उत्तर देताना उर्वशीने ऋषभला ‘छोटू भय्या’ म्हटलं होतं. दोघांमधील हा वाद अनेक दिवस चर्चेत होता. मात्र, त्यानंतर एका कार्यक्रमात उर्वशीने या सगळ्यावर माफी देखील मागितली होती. अर्थात तिने थेट ऋषभची माफी मागितली नसली, तरी तिने या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा :