Urvashi Rautela Birthday : उर्वशी रौतेलाने वाढदिवशी कापला 24 कॅरेट सोन्याचा केक; फोटो पाहून चाहते हैराण
Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने वाढदिवशी चक्क 24 कॅरेट सोन्याचा केक कापला आहे. अभिनेत्रीचे केक कट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. आज अभिनेत्री आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपला 30 वा वाढदिवस खास करण्यासाठी तिने चक्क 24 कॅरेट सोन्याचा केक कापला आहे. अभिनेत्रीचे केक कट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
उर्वशी रौतेलाने वाढदिवशी कापला 24 कॅरेट सोन्याचा केक
उर्वशी रौतेला अनेकदा व्यावसायिक कामांपेक्षा तिच्या लग्झरी लाईफस्टाईलमुळे चर्चेत असते. पण आता ती तिच्या बर्थडे केकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने तिचा 30 वा वाढदिवस 'लव्ह डोज 2'च्या सेटवर साजरा केला आहे.
'हेट स्टोरी 4' फेम उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री हनी सिंहसोबत आपला वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. वाढदिवशी तिने 24 कॅरेट सोन्याचा केक कट केला आहे. दरम्यान तिच्या लाल रंगाच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर हनीने काळ्या रंगाचा लूक केला होता. अभिनेत्रीने 24 कॅरेट सोन्याचा केक कट केल्याने चाहते हैराण झाले आहेत.
View this post on Instagram
उर्वशी रौतेलाने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"लव्ह डोज 2'च्या सेटवर वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. माझ्या या प्रवासात मी हनी सिंहचे आभार मानते. त्याच्यामुळे माझा वाढदिवस आणखी कमाल झाला आहे. माझ्या आयुष्यात तुमचा मोलाचा वाटा आहे".
उर्वशी रौतेला सध्या तिच्या आगामी दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. एखाद्या बड्या अभिनेत्रीपेक्षा उर्वशीचा मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामर तिचे 70 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. उर्वशीने गेल्यावर्षी हिऱ्यांनी सजवलेला केक कट केला होता. उर्वशी वाढदिवशी फक्त केकवर लाखो रुपये खर्च करत असते. अहमदाबादमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान उर्वशीचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
संबंधित बातम्या
Urvashi Rautela :आईच्या वाढदिनी बॅकलेस ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाचा भन्नाट डान्स; चाहते म्हणाले,'वीजेचा झटका बसलाय का'?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
