एक्स्प्लोर
उर्मिला मातोंडकरचं 10 वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन
बेवफा ब्यूटी हे ब्लॅकमेल या सिनेमातील एकमेव गाणं असून उर्मिला बारमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे लटके-झटके मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना मिळणार आहे. 'ब्लॅकमेल' चित्रपटात उर्मिला 'बेवफा ब्यूटी' या आयटम नंबरमध्ये दिसणार आहे. तब्बल दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये उर्मिला पुनरागमन करत आहे.
बेवफा ब्यूटी हे गाणं पावनी पांडेने गायलं असून अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलं आहे. अमित भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. अभिनय देव दिग्दर्शित 'ब्लॅकमेल' चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातील हे एकमेव गाणं असून उर्मिला बारमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे.
'चायना गेट' चित्रपटातील छम्मा छम्मा या आयटम नंबरमध्ये उर्मिलाच्या अदांनी प्रेक्षक घायाळ झाले होते. लज्जा, कंपनी सारख्या चित्रपटातही तिने आयटम नंबर केले होते. 2007 मध्ये 'राम गोपाल वर्मा की आग' नंतर (मेहबूबा) ती बॉलिवूडमध्ये आयटम डान्स करताना दिसली नव्हती.
उर्मिलाने तिच्या कारकीर्दीत रंगिला, सत्या, दौड, जुदाई, कौन, मस्त, खुबसूरत, जंगल, भूत, पिंजर अशा असंख्य चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारली आहे. ईएमआय (2008) या चित्रपटानंतर ती हिंदी पडद्यावर झळकली नाही.
'हृदयनाथ' (2008) हा तिचा आयटम साँग असलेला मराठी चित्रपट. 'आजोबा' (2014) या मराठी चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा करताना ती मोठ्या पडद्यावर अखेरची दिसली होती. दरम्यानच्या काळात झलक दिखला जा 2 (2007), मराठी पाऊल पडते पुढे (2011) डान्स महाराष्ट्र डान्स (2012) यासारख्या डान्स रिअॅलिटी शोजचं परीक्षण उर्मिलाने केलं.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement