Urfi Javed: उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी; गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फीला (Urfi Javed) बलात्काराची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Urfi Javed: अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदला (Urfi Javed) जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फीला बलात्काराची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
नविन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल
व्हॉट्सअॅपवर कॉलवरुन अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फीला बलात्काराची आणि जिवे मारण्यातची धमकी देण्यात आली आहे. तसेच तिच्या फॅशन स्टाईलबद्दल देखील या कॉलमध्ये कमेंट करण्यात आली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. नविन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
उर्फी ही तिच्या फॅशनमुळे आणि अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फी ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. उर्फीला बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर 3.9M मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
नुकतीच 'मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022' (Most Searched Asian on Google 2022) ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उर्फी ही 43 व्या क्रमांकावर आहे.या यादीमध्ये उर्फीनं जान्हवी कपूर, सारा अली खान या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.
2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: