Prabhas : नेटफ्लिक्सवर भडकले प्रभासचे फॅन्स; Unsubscribe Netflix हॅशटॅग झाला ट्रेंड
नुकताच नेटफ्लिक्स इंडोनेशियानं (Netflix) प्रभासच्या (Prabhas) साहो या चित्रपटामधील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटफ्लिक्सकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओची अनेक जण खिल्ली उडवत आहेत.
Prabhas : प्रभास (Prabhas) हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील वापरण्यात आलेल्या व्हिएफएक्सला अनेक जण ट्रोल करत आहेत. नुकताच नेटफ्लिक्स इंडोनेशियानं (Netflix) प्रभासच्या साहो या चित्रपटामधील एका व्हिडीसीनचाओ शेअर केला आहे. नेटफ्लिक्सकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओची अनेक जण खिल्ली उडवत आहेत. आता प्रभासचे चाहते नेटफ्लिक्सवर भडकले आहेत. सध्या Unsubscribe Netflix हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
प्रभासचा 2019 मध्ये रिलीज झालेला साहो या चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ नेटफ्लिक्स इंडोनेशिया या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये प्रभास हा Banzai Skydiving करताना दिसत आहे. या व्हिडीओची काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. त्यानंतर प्रभासचे चाहते नेटफ्लिक्सवर भडकले.
पाहा व्हिडीओ:
Kamu NeeenYha ini akSi apAa? pic.twitter.com/RoWaMNYGIT
— Netflix Indonesia (@NetflixID) November 2, 2022
काय म्हणाले चाहते?
'हे जास्त होत आहे.' असं ट्वीट शेअर करत एका नेटकऱ्यानं Unsubscribe Netflix आणि प्रभास या हॅशटॅगचा वापर केला. नेटफ्लिक्सला लाज वाटली पाहिजे. साहो चित्रपटातील सिनचा व्हिडीओ शेअर करुन प्रभासला ट्रोल केलं जात आहेत. त्यानं पॅराशूट बॅगला फेकलं आणि उडी मारली. या Banzai skydiving म्हटलं जात. त्याला जे ट्रोल करत आहेत, ते मुर्ख लोक आहेत.
2019 मध्ये रिलीज झालेल्या साहो या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजीत यांमी केले. या चित्रपटात प्रभाससोबतच श्रद्धा कपूर, नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ आणि चंकी पांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
प्रभासने 'ईश्वर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'राघवेंद्र', 'वर्षम', 'योगी', 'एक निरंजन', 'रेबेल', 'बाहुबली : द बिगनिंग', बाहुबली : द कन्क्लूजन, राधे श्याम यांसारख्या चित्रपटात त्यानं काम केलं. आता लवकरच त्याचा आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: