एक्स्प्लोर

Sheezan Khan : "शिझानच्या पाठीशी चाहते खंबीर"; जामीन मिळाल्यानंतर कुटुंबियांनी मानले आभार

Sheezan Khan : शिझान खानला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Sheezan Khan : अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानला (Sheezan Khan) अखेर जामीन मिळाला आहे. दोन महिने आणि 10 दिवसांनी त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. शिझानला जामीन मिळाल्याने कुटुंबियांसह चाहते आनंदी झाले आहेत. त्याच्या कुटुंबियांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

शिझानला जामीन मिळाल्यानंतर त्याची बहीण फलक नाज (Falaq Naaz) म्हणाली, "शिझानच्या चाहत्यांचे खूप खूप आभार. चाहत्यांनी त्याला खूप पाठिंबा दिला आहे. शिझान अडचणीत असताना खंबीरपणे साथ देणारे चाहते त्याला भेटले आहेत, याचा खरचं अभिमान वाटतो. शिझानचा मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी शिझानला पाठिंबा दिला आहे. चाहत्यांनी शिझानला कशी मदत केली आहे हे तो बाहेर आल्यावर त्याला नक्की सांगू". 

एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिझानच्या वकिलांनी 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीनासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील अर्ज केला होता. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

शिझानची बहिण फलक नाजदेखील अभिनेत्री आहे. 'महाकाली - अंत ही आरंभ है', 'रूप', 'विष या अमृत', 'ससुराल सिमर का' यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. फलकनं काही दिवसांपूर्वी तुनिषाच्या बर्थ-डे निमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. 

शिझान खानला पोलिसांनी ताब्यात का घेतलं? 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं. 

तुनिषा आणि शिझान 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल' ही मालिका करत होते. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते रिलेशनमध्ये आले. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर तुनिषाने गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर शिझानवर अनेक आरोप लावण्यात आले होते.

संबंधित बातम्या

Sheezan Khan : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला दिलासा; जामीन मंजूर, 2 महिने अन् 10 दिवसांनी तुरुंगातून सुटका

महत्त्वाच्या बातम्या

Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
Akshay Waghmare wife yogita gawali: 'डॅडी' अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला...
'डॅडी' अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला...
Welcome to the jungle dhamaal 4: गुरुवारी बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटानं वर्चस्व गाजवलं? 'धमाल 4' की 'वेलकम टू द जंगल', कुणाचं पारडं भारी?
गुरुवारी बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटानं वर्चस्व गाजवलं? 'धमाल 4' की 'वेलकम टू द जंगल', कुणाचं पारडं भारी?
Aamir Khan On Sonam Wangchuk Hunger Strike: 'फुंसुक वांगडू, सोनम वांगचुक यांचा संबंधच नाही...'; आमिर खाननं स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केला, उपोषणाबाबत म्हणाला...
'फुंसुक वांगडू, सोनम वांगचुक यांचा संबंधच नाही...'; आमिर खाननं स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केला, उपोषणाबाबत म्हणाला...

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Embed widget