एक्स्प्लोर

टीम इंडियासाठी धोनीला अनफिट वाटलेले 'ते' 3 खेळाडू कोण?

नवी दिल्लीः टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक 'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'चा मच अवेटेड ट्रेलर अखेर लाँच झाला आहे. धोनीने मुंबईत या सिनेमाचं ट्रेलर लाँच केलं. यावेळी अभिनेता सुशांत सिंह राजपूत देखील उपस्थित होता. धोनीच्या आयुष्यातील अनेक किस्से या ट्रेलरमधून उलगडले आहेत.   धोनीने निवडकर्त्यांना 'ते' तीन खेळाडू सध्या संघासाठी अनफिट आहेत, असा सल्ला देत त्यांना बाहेर करण्याचं सुचवलं आहे. ट्रेलरमधील हे किस्से पाहता सिनेमातून अनेक सस्पेंस समोर येतील, असं दिसत आहे.   कोण आहेत ते तीन खेळाडू? संघातून तीन खेळाडूंना बाहेर करण्याचा सल्ला दिल्यानंतर निवडकर्त्यांनी धोनीच्या या निर्णयाला विरोध केला. मात्र धोनीने निवडकर्त्यांना एकनिष्ठतेचा मंत्र दिला. आपण देशाचे सेवक आहोत आणि हे आपलं कर्तव्य आहे, अशा शब्दात धोनीने निवडकर्त्यांना सुनावलं आहे.   दरम्यान ते तीन खेळाडू कोण होते, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. वेस्ट इंडिजमध्ये 2007 च्या विश्वचषकात टीम इंडिया पहिल्याच फेरीत बाहेर पडल्यानंतर टीमवर नजर टाकली असता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या तीन खेळाडूंचं स्थान धोक्यात आलं होतं.   dhonitrailer1208   पाकिस्तानविरुद्ध 2007 मध्ये ग्वालियर वन डे सीरिजनंतर सौरव गांगुलीला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तर ऑक्टोबर 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्यानंतर राहुल द्रविडला दोन वर्ष संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. द्रविडने 2011 साली इंग्लंडच्या वन डे आणि टी-20 दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर लगेचच निवृत्तीची घोषणा केली होती.   मात्र सचिनने त्यानंतरही बराच काळ टीममध्ये घालवला. त्यामुळे तिसरा खेळाडू कोण आहे, याचा खुलासा ट्रेलरमध्ये करण्यात आलेला नाही. धोनीला अनफिट वाटणारे टीममधील ते तीन खेळाडू कोण, याचा खुलासा 30 सप्टेंबरला सिनेमा रिलीज झाल्यानंतरच होणार आहे.   पाहा ट्रेलरः

महत्त्वाच्या बातम्या

Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
Salman Khan Bigg Boss 20: 'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget