एक्स्प्लोर
निवडणुकीच्या धामधुमीत रिंकू राजगुरुच्या 'कागर'चा दमदार ट्रेलर रिलीज
कागर चित्रपटात शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मकरंद माने यांच्या खांद्यावर आहे. कागर येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : 'सैराट' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आगामी चित्रपट 'कागर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 26 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'कागर'च्या ट्रेलरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. “तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार' अशा घोषणा देत रिंकू राजगुरु ‘कागर’च्या रणधुमाळीत उतरली आहे. ग्रामीण राजकारणाचं वास्तवादी चित्र आपल्याला 'कागर'मध्ये दिसेल.
सैराटमधील आर्ची फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात लोकप्रिय झाली होती. त्यानंतर रिंकूनचे 'सैराट'च्या कन्नड व्हर्जनमध्ये भूमिका केली, मात्र मराठीतला हा तिचा दुसराच सिनेमा आहे. ‘कागर’च्या माध्यमातून रिंकू राजगुरु मोठ्या पडद्यावर तीन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कागर चित्रपटात शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मकरंद माने यांच्या खांद्यावर आहे. कागर येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 'सैराट'प्रमाणेच हा प्रेमकथा आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट आहे.
...म्हणून रिंकूच्या 'कागर'साठी आणखी वाट पाहावी लागणार!
हा सिनेमा 14 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार होता. मात्र रिंकूच्या बारावीच्या परीक्षेमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यातच 26 तारखेला 'मार्व्हल : अॅव्हेंजर एंडगेम' हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांनी प्रदर्शनाची तारीख बदलण्याची मागणी केली आहे.
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement