एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानसोबत काम करायचं आहे, 'मिस इंडिया सिनी शेट्टीने व्यक्त केली इच्छा

कर्नाटकच्या सिनी शेट्टीने 'मिस इंडिया 2022' हा किताब नुकताच पटकावला आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सिनीने 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेदरम्यानच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. मुलाखतीदरम्यान सिनी म्हणाली की, 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेसाठी मला प्रियंका चोप्राने प्रोत्साहित केलं आहे. 

सुबोध भावे महिलांसाठी घेऊन येतोय खास राखीव बस; 'बस बाई बस'चा टीझर आऊट

'तुला पाहते रे' ही छोट्या पडद्यावरची मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील विक्रांत सरंजामे आजही प्रेक्षकांना भुरळ घालतो आहे. आता तीन वर्षांनंतर सुबोध भावे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. सुबोधचा 'बस बाई बस' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

वरुण-जान्हवीने 'बवाल'च्या शूटिंगला केली सुरुवात

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांचा आगामी 'बवाल' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी आणि वरुणने आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. जान्हवीने फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

कौतुकास्पद! 'एकदा काय झालं'च्या शूटिंगदरम्यान 'प्लॅस्टिक बंदी', प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळला

'एकदा काय झालं' या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आल्यापासून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एकही प्लास्टिकची बाटली वापरण्यात आली नाही.

लघुपटाद्वारे राम मंदिराचा 500 वर्षांचा इतिहास उलगडणार

 राम मंदिरासाठी करण्यात आलेले आंदोलन तसेच त्यावेळी लोकांनी केलेला संघर्ष आता एका लघुपटाद्वारे मांडण्यात येणार आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये 1528 पासून ते राम मंदिराच्या निर्मितीपर्यंतच्या कालावधीमध्ये घडलेल्या सर्व घटना दाखवण्यात येणार आहेत. या डॉक्यूमेंट्रीचा उद्देश हा राम मंदिराचा गेल्या 500 वर्षांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. या डॉक्यूमेंट्री चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरामध्ये पूजा केल्याचे दृष्य देखील दाखवण्यात येणार आहे. 

‘काली’ डॉक्युमेंट्री पोस्टर वाद, लीना मणिमेकलाईसह आणखी दोन जणांविरोधात एफआयआर दाखल

‘काली’ या माहितीपटाच्या वादग्रस्त पोस्टरमुळे सध्या सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये दाखवलेल्या दृश्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर निर्माती विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. आता या माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्यासह, सहनिर्माते आणि चित्रपट संपादक यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. लखनऊच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात सोमवारी (4 जुलै) हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

'क्या एक मेंढक और बिच्छू दोस्त हो सकते है?'; डार्लिंग्सचा धमाकेदार टीझर रिलीज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटच्या डार्लिंग्स या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलियासोबतच शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आलियानं डार्लिंग्स चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सुपरस्टार चिरंजीवीच्या चित्रपटातून सलमान खान करणार साऊथ डेब्यू

 सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आरआरआर, बाहुबली, पुष्पा यांसारख्या साऊथ चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनेता  चिरंजीवी यांचा 'गॉडफादर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमधील चिरंजीवी यांच्या स्टायलिश लूकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

'राजकारणात प्रवेश करणार का?'; अक्षय कुमारच्या उत्तरानं वेधलं लक्ष

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि करिअरबाबत चाहत्यांना माहिती देत असतो. अक्षयनं नुकतीच लंडनच्या पल मॉलमधील  इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्स यांनी आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रकाश सोहळ्याला हजेरी लावली. या प्रकाशन सोहळ्यामध्ये अक्षयला राजकारणाबाबत  विचारण्यात आलं. अक्षय हा राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये  त्याला विचारण्यात आला. या प्रश्नाला अक्षयनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

ठाण्यात रंगणार 'आयुष्यावर बोलू काही'चा विनामूल्य कार्यक्रम

ठाण्यात लवकरच 'आयुष्यावर बोलू काही' बहुचर्चित कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांचा 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य असणार आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
Embed widget