TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'शिवप्रताप गरुडझेप'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या ट्रेलरमधील अमोल कोल्हेंच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधलंय. 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
5 ऑक्टोबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा!
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टातून 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जॅकलिनचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने तब्बल 15 तास जॅकलिनची चौकशी केली. ईडीच्या चौकशीनंतर सुकेश आणि जॅकलिनमध्ये मैत्रीचे संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर पटियाला कोर्टालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर जॅकलिनला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीसाठी आज जॅकलिन कोर्टात हजर झाली. या प्रकरणात ईडीने 17 ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलिनला 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असल्याचे म्हणण्यात आले होते. त्यानंतर जॅकलिनच्या अडचणी वाढत गेल्या. मात्र, आता जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला असून, तिचा अंतरिम मंजूर करण्यात आला आहे.
रोजंदारीवर काम करणारी वर्षा ठरली ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ ची विजेती
छोट्या पडद्यावरील ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडलाय. हरियाणाची, रोजंदारीवर काम करणारी वर्षा बुमरा डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्सच्या तिसऱ्या सिझनची विजेती ठरली. वर्षाच्या फॉर्मन्सनं अनेकांची मनं जिंकली.
‘सूर नवा ध्यास नवा’चा उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक
‘सूर नवा ध्यास नवा’या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. या स्पर्धकांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. या कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राजगायक होण्याचा मान उत्कर्ष वानखेडे याने पटकावला.
बहुचर्चित "आपडी थापडी" चित्रपटाचा ट्रेलर लाँच
आगामी बहुचर्चित "आपडी थापडी" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय, दमदार कथा आणि तांत्रिकदृष्ट्याही परिपूर्ण असलेला हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तुषार कालिया ठरला ‘खतरों के खिलाडी 12’चा विजेता
जवळपास ३ महिने चाललेल्या ‘खतरों के खिलाडी १२’ या शोने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. नुकतीच या शोच्या १२ व्या सीझनच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. तुषार कालियाने फैजल शेख आणि मोहित मलिक यांना मात देत ‘खतरों के खिलाडी 12’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
'त्याला' बिग बॉसच्या घरात बंद केलं पाहिजे; महेश मांजरेकरांची एबीपी माझाला Exclusive माहिती
'बिग बॉस मराठी'च्या घरात महेश मांजरेकरांना सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, शिवाली परब, नम्रता संभेराव, प्रवीण तरडेंना बघायला आवडेल. हे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच कल्ला करतील आणि हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील.
'दिसण्यापेक्षा अभिनयाकडे लक्ष द्या' : वर्षा उसगांवकर
वर्षा उसगांवकर सध्या 'हवाहवाई' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी 'दिसण्यापेक्षा अभिनयाकडे लक्ष द्या', असा सल्ला काही अभिनेत्रींना दिला आहे.
'विक्रम वेधा' सिनेमातील 'बंदे' गाणं आऊट
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेता सैफ अली खानचा आगामी 'विक्रम वेधा' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'बंदे' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणाऱ्या '36 गुण'चे पोस्टर आऊट
मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर सध्या चर्चेत आहे. संतोषचा आगामी '36 गुण' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. '36 गुण'च्या रोमॅंटिक पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'मन कस्तुरी रे' मध्ये दिसणार अभिनय-तेजस्वीची कमिस्ट्री
नवरात्री म्हटलं की नवचैतन्य, जोश, उल्हास. हेच सुंदर वातावरण अधिकच बहारदार आणि रंगमय करण्यासाठी मुंबई मुव्हिस स्टुडिओज घेऊन आले आहे 'मन कस्तुरी रे'चे नवे पोस्टर. नवरात्रीच्या निमित्ताने हे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे प्रेमाच्या रंगात दंग होऊन नाचताना दिसत आहेत. संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या 4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
