TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'मास्टरशेफ इंडिया'चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
भारताचा सर्वात लाडका कुकिंग रिअॅलिटी शो 'मास्टरशेफ इंडिया' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा हा शो स्टार वाहिनीवर नाही तर, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्ह याठिकाणी पाहता येणार आहे. नव्या आणि उत्साही स्पर्धकांच्या पाककौशल्याद्वारे हा शो प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे. मास्टरशेफमधून लवकरच भारताचा नवा मास्टरशेफ शोधण्याची मोहीम सुरू होणार असून, त्यासाठीच्या ऑडिशन्सची सुरुवात कोलकाता येथून होणार आहे व त्यानंतर मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली इथे या प्रवेश फेऱ्या पार पडणार आहेत.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना भरावे लागणार 10 लाख?
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांना सहा आठवड्याच्या आत 10 लाख 78 हजार 593 रुपये भरण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिले आहेत. पुण्यात पार पडलेल्या 'मानाचा मुजरा' या कार्यक्रमासाठी तात्कालीन संचालकांनी 52 लाख रुपये खर्च केले होते. यावर सभासदांनी आक्षेप घेतला होता. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात प्रथमच कारवाई झाली असल्याचं अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली आहे.
प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? 'राष्ट्रीय चित्रपट दिनी' एमएआयने घेतलेल्या निर्णयावर हेमंत ढोमेचा सवाल
हेमंत ढोमे ट्वीट करत म्हणाला आहे," आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी 75 रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्यानंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली आहे. सगळीकडे मराठी सिनेमा हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?"
भाईजानच्या बिग बॉसमध्ये प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
सलमान खानचा 'बिग बॉस 16' हा कार्यक्रम सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे सध्या या कार्यक्रमात कोणते स्पर्धक असतील, 'बिग बॉस 16'चं घर कसं असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. तसेच या पर्वात ताजिकिस्तानचे सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
बॉईजचा तिसरा डाव सुपरहिट
'बॉईज 3' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. गेल्या आठवड्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रिलीजच्या एका आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 4.96 कोटींची कमाई केली आहे.
'तुझेच मी गीत गात आहे' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर
मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. या आठवड्यात 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.
‘शाकुंतलम’ची रिलीज डेट जाहीर!
साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि चित्रपटांमुळे चर्चेत आहे. समंथाचा नवा चित्रपट 'शाकुंतलम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज झाले होते. चित्रपटाचे हे पोस्टर पाहिल्यानंतर चाहते नवी अपडेट मिळवण्यासाठी उत्सुक झाले होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टरही रिलीज केले आहे.
आमिर खानची लेक आयरा झाली ‘एंगेज’
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानची लेक आयरा सध्या चर्चेत आहे. आयरा फिल्मी दुनियेत फारशी सक्रिय नाही. पण, तरीही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगत असते. नुकताच तिने एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे तिला अतिशय रोमँटिक अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे.
जॉनी डेप पुन्हा एकदा प्रेमात
मानहानीच्या खटल्यामुळे हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्यांची पूर्वपत्नी एम्बर हर्ड जगभरात चर्चेत आले होते. या खटल्याचा निकाल अभिनेता जॉनी डेप याच्या बाजूने लागला होता. या निकालानंतर अभिनेता प्रचंड चर्चेत आला होता. मात्र, आता अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या अभिनेता त्याच्या वकिलांच्या टीममधील एका तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या वकील तरुणीने ‘सन’विरुद्ध यूकेच्या मानहानीच्या खटल्यात जॉनी डेपची बाजू सांभाळली होती. पेज सिक्समधील रिपोर्टनुसार, या लंडनस्थित वकील तरुणीचे नाव जोएल रिच आहे.
रिचा चढ्ढा-अली फजल इकोफ्रेंडली पद्धतीनं करणार लग्न
रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच लग्नबंधनात अडकणारं हे जोडपं इको फ्रेंडली पद्धतीने लग्न करणार आहेत. रिचा आणि अली यांचं पर्यावरणाविषयी असलेलं प्रेम आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. अनेक व्यासपीठांवर त्यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी भाष्य केलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी अशा अनोख्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.