TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
बिग बॉसच्या मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! चौथा सीझन लवकरच येणार भेटीला
बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन संपल्यापासून प्रेक्षक चौथ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. आता कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा पहिला प्रोमो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
‘ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर’च्या टीझरमध्ये दिसली चॅडविक बोसमनची झलक!
‘ब्लॅक पँथर’च्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'ब्लॅक पँथर’ हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे, जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथरच्या पात्रावर आधारित आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.
आलिया-रणबीरच्या 'केसरिया' गाण्याने केला रेकॉर्ड
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड केला आहे.
'द सॅंडमॅन'चा ट्रेलर आऊट
नेटफ्लिक्सवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. अशाच वेगळ्या विषयावर भाष्य करणारी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द सॅंडमॅन' असे या वेबसीरिजचे नाव आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
‘ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर’च्या टीझरमध्ये दिसली चॅडविक बोसमनची झलक!
‘ब्लॅक पँथर’च्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 'ब्लॅक पँथर’ हा एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे, जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथरच्या पात्रावर आधारित आहे. 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर' हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.
गौरी खानने चाहत्यांना दाखवली मन्नतची झलक
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानप्रमाणेच गौरी खानदेखील लोकप्रिय आहे. गौरी खान सिनेमांत काम करत नसली तरी ती बॉलिवूडची एक नामांकित इंटीरियर डिजायनर आहे. तसेच ती शाहरुखच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊसचे कामदेखील सांभाळते. 'मन्नत'चा एक-एक कोपरा गौरीने सजवला आहे. अशातच आता गौरीने 'मन्नत'मधील काही फोटो शेअर करत चाहत्यांना 'मन्नत'ची झलक दाखवली आहे.
'कौन बनेगा करोडपती 14'चा 7 ऑगस्टला होणार प्रीमियर
'कौन बनेगा करोडपती' हा प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या लोकप्रिय कार्यक्रमाचा प्रीमियर 7 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी प्रीमियरला हजेरी लावणार आहेत.
'बनी' देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही मारली बाजी!
निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित–दिग्दर्शित 'बनी' या चित्रपटाचा फर्स्टलूक 75व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये 'बनी'च्या प्रवेशिका सादर करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी ढाका येथील प्रसिद्ध 'सिनेमेकिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' निवड झाल्यानंतर स्पेन येथील जगप्रसिद्ध 'माद्रिद' आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाची निवड झाली.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं नावही नाही! दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात...
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत लिहिले की, ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यश मिळवल्याबद्दल सूरराई पोटरु, सूर्या, अपर्णा बालमुरली, सुधा कोंगारा आणि अजय देवगण यांचे खूप अभिनंदन. साऊथ सिनेमासाठी सध्या चांगले दिवस आहेत. त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीला अधिक मेहनत करण्याची गरज आहे.’
'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर साजरा झाला डॉ. मोहन आगाशे यांचा वाढदिवस
'सूर नवा ध्यास नवा' या लोकप्रिय गाण्याच्या कार्यक्रमाचे पाचवे पर्व आजपासून सुरू होत आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या मंचावर डॉ. मोहन आगाशे यांचा 75 वा वाढदिवस साजरा झाला आहे. कलर्स मराठीने यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.